Samsung Galaxy S24 Series Indian Launch Date Expected Price Specification Color Option

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsung Galaxy S24 Series : कोरियन कंपनी सॅमसंगचा (Samsung) यंदाचा सर्वात मोठा इव्हेंट गॅलेक्सी अनपॅक्ड 2024 कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोनव्यतिरिक्त AI अपडेट्स देणार आहे. लीकनुसार, कंपनी या इव्हेंटमध्ये आपले गॉस एआय टूल लाँच करू शकते. Samsung Galaxy S24 Series बद्दल  मोबाइल प्रेमींमध्ये उत्सुकता चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. यावेळी Samsung Galaxy S24 Series खूप खास असणार आहे कारण कंपनी AI फीचर्सला सपोर्ट करणार आहे. AIच्या मदतीने तुम्ही फोनमध्ये लाइव्ह फोन कॉल ट्रान्सलेशनपासून फोटो एडिटपर्यंत अनेक गोष्टी करू शकाल. 

200 MP चा कॅमेरा

आयफोन 15 प्रो मॅक्सप्रमाणेच यावेळी गॅलेक्सी एस 24 अल्ट्रामध्ये तुम्हाला टायटॅनियम फ्रेम, फ्लॅट डिस्प्ले आणि थिन बेजल्स मिळतील. गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा मध्ये मागील वेळेप्रमाणे 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. रोलंड क्वांडने शेअर केलेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी S24, S24 प्लस आणि S 24 अल्ट्रा ब्लॅक, ब्लू, व्हाईट आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये बाजारात येऊ शकतात.  सर्व मॉडेल्समध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि अल्ट्राला नेहमीप्रमाणे एस-पेन मिळेल. गॅलेक्सी एस 24 सीरिजमध्ये Exynos 2300 या Snapdragon 8 Gen 3 SoC , कमीतकमी  8/12GB जीबी रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 

‘हे’ आहेत काही नवीन फीचर्स 

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. दरम्यान, काही नवीन फिचर्स  समोर आले आहेत.  कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंग जानेवारीमध्ये Galaxy S24 सीरीज लॉंच करणार आहे. या सिरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन लॉन्च केले जातील, त्यापैकी सर्वात खास Samsung Galaxy S24 Ultra असेल. मागील फोनप्रमाणे या मोबाईल फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. मात्र, यावेळी या सिरीजमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे कारण यामध्ये Qualcomm ची नवीन चिप दिली जात आहे. दरम्यान, Galaxy S24 Ultra बाबत काही नवीन लीक्स समोर आले आहेत. Galaxy S23 ची  कॅमेरा क्वालिटी चांगली असूनही फोटो कधीकधी ओव्हर सॅच्युरेटेड झाल्यामुळे आपल्याला फोटोंमधील रंग मूळ दिसत नाहीत. Galaxy S24 Ultra मध्ये ही समस्या दूर करण्यात आली आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगलं सॅचुरेशन आणि शार्पनेस मिळेल. 

इतर महत्वाची बातमी-

Whatsapp Feature Update For iphone :आता आयफोन युजर्सना येणार मज्जा! व्हॉट्सॲप घेऊन आलंय कमाल स्टिकर्स फिचर, 3 स्टेप्स वापरा अन् मित्रांसोबत मजेशीर चॅटिंग करा!

[ad_2]

Related posts