Sanjay Raut On Rahul Narwekar And Mla Disqualification Case Seat Of South Mumbai Is Ours Says Sanjay Raut PC Marathi News Congress Milind Deora

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut PC : दक्षिण मुंबईची जागा आमचीच असल्याचा पुर्नरुच्चार शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच्या या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘काल पहिलाच दौरा कल्याणमध्ये केला. उध्दव ठाकरेंनी फक्त शाखांना भेटी दिल्या पण तिथे सभेचे रुप आलं. अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, कळवा या ठिकाणी उध्दव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला, तो पाहता कल्याण शिवसेनेचे आहे आणि खऱ्या शिवसेनेचाच राहिल, हे कालस पुन्हा एकदा स्पष्ट झालं. कल्याणची बांधणी पूर्ण होत आहे, लवकरच तिथला उमेदवार जाहीर होईल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.’ संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेतही माहिती दिली.

‘दक्षिण मुंबईची जागा आमचीच’

‘जर कुणी निवडणुकांसाठी किंवा पदासाठी पक्ष बदलणार असतील,  तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरु झाली आहे. त्या परंपरेनुसार, ते (मिलिंद देवरा) पक्ष बदलणार असतील, तर त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी यावर का बोलू, माझा आणि माझ्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे, अरविंद सावंत दोनदा निवडून आले आहेत’, असं राऊत म्हणाले आहेत.

‘राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादा ओलांडल्या’

आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ”जो निकाल दिला गेलाय, त्याविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातोय. धानसभा अध्यक्ष यांची अंत्ययात्रा काढल्या जात आहेत, ही लोकशाहीची अंत्ययात्रा असल्याची भावना जनतेच्या मनात आहे. अत्यंत खोटेपणाचा कळस हा निकाल आहे. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्ष पदावरील ही व्यक्ती निष्पक्ष असते पण, राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचा उल्लंघन केलं आहे.

16 जानेवारीला उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद

या सर्वाची चिरफाड करणारी एक महापपत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघतेय, तिरडी बाधूल लोक स्मशानाकडे का निघाले आहेत, हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी, हे का घडत आहेत, या निकालाची चिरफाड करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत. वरळी येथे 16 जानेवारीला दुपारी 4 वाजता डोम खाली उध्दव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार आहेत. 

जनतेच्या न्यायालयामध्ये निकालाची चिरफाड होईल

या पत्रकार परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित असतील, वकील असतील, कायदेतज्ज्ञ असतील आणि जनतेला या पत्रकार परिषदेचं आमंत्रण देण्यात आलं आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये निकालाची चिरफाड होईल. उद्या स्वत: उद्धव ठाकरे याबाबत अधिक माहिती देतील. देशाच्या इतिहासातील अशी पहिली खुली पत्रकार परिषद ही पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेसमोर उद्धव ठाकरे घेतील.”

”हिंमत असेल तर”, संजय राऊतांचं आवाहन

पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय. पक्ष जागेवर आहे, कार्यकर्ते जागेवर आहेत, शिवसैनिक जागेवर आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय. तुमचे मुख्यमंत्री काहीही बोलू दे. त्यांच्या पक्ष कुठे आहे. चोरलेला पत्र, चोरीचा माल, हापापाचा पक्ष, तो तुमचा पक्ष असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष उभा करा, स्थापन करा आणि मग बोला. चोरलेल्या पक्षावर डिंग मारु नका. 

राऊतांची नारायण राणेवर टीका

‘एक केंद्रीय मंत्री, नारायण तातू राणे, यांनी शंकराचार्य यांच्या बद्दल एक भूमिका व्यक्त केली, जसे ख्रिश्चन धर्मात पोप असतात, मुस्लिम धर्मात त्यांचे धर्मगुरू असतात तसे शंकराचार्य आमच्या साठी आहेत, धर्माचे मार्ग दाखवतात, पण हे कोणी जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी 22 तारखेच्या आधी माफी मागावी’, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

 

 

[ad_2]

Related posts