Why Married Women do not celebrate Makar Sankrant as a First Festival After Wedding Know the Reason; नवविवाहित जोडपं मकर संक्रांत पहिला सण म्हणून का साजरा करत नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो मकर संक्रांत. मकर संक्रांत हा अगदी एका दिवसावर आला आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. असं असताना नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिला सण संक्रांत आला तर ती साजरी करत नाही. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया. 

मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो. पण लग्न झालेल्या महिला पहिली संक्रातं सासरी साजरी करत नाहीत. ते का जाणून घेऊया.. 

(हे पण वाचा – Makar Sankranti Wishes : मकर संक्रांतीला तिळगुळासोबतच द्या गोड शुभेच्छा) 

संक्रांत का साजरी करत नाहीत?

ज्या स्त्रिया लग्न होऊन सासरी येतात आणि पहिली मकर संक्रांत स्त्रियांची असते त्या पहिली मकर संक्रांत सासरी साजरी करत नाहीत. यामागे कारण पहिली जी मकर संक्रांत असते या संक्रांतीला स्त्रियांना वंशा असतो, असे म्हणतात. ज्या स्त्रियांची पहिली संक्रांत आहे त्यांच्या अखंड सौभाग्यासाठी त्यांनी ती सासरी साजरी करू नये. 

काय करावे?

सासरवरून संपूर्ण वाणाचे सामान घेऊन तसेच वस्त्र घेऊन माहेरी जावे आणि तेच वस्त्रे परिधान करून संक्रांत साजरी करावी. पैसा पुढे चालण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी ऊस, बोर, जाब, कणीस या प्रकारे मानाचे सामान घ्यावं सगळे घ्यावे आणि या प्रकारे मकर संक्रांत माहेरी साजरी करावी. यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि वंशा सुरू राहतो, असे सांगितले जाते. 

मकर संक्रांतीला काळी वस्त्र का धारण करतात?

मकर संक्रांतीपासून सूर्य हा उत्तरायणमध्ये येतो. दक्षिणायन संपून उत्तरायणमध्ये सूर्याने प्रवेश केल्यानंतर उन्हाळा सुरू होतो. आपल्या संसाराला कुणाची ही काळी नजर लागू नये म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे धारण करण्याची परंपरा आहे. उन्हाळ्याचा पहिला दिवस असल्याने काळ्या कपड्यांमध्ये ऊन शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. हिवाळ्यानंतर काळ्या कपड्यांद्वारे उन्ह शरीरात शोषून घेता यावं हा देखील यामागचा उद्देश असतो.   त्यामुळे देखील काळे कपडे घालायला प्राधान्य दिलं जातं मात्र ही एक वैज्ञानिक कारण आहे. शास्त्रानुसार संसाराला कुणाची नजर लागू नये म्हणून काळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे,असंही सांगितलं जातं. 

Related posts