Milind deora resigns from congress LIVE Updates Join Shiv Sena Shinde Group Cm Eknath Shinde BJP Mumbai South central lok sabha constituency thackeray group MP Arvind Sawant Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Milind Deora Resigns LIVE Updates: काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस  सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार आहे.. तसंच  सकाळी 11 वाजता सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमीका माध्यमांसोर स्पष्ट करतील.

दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत  प्रवेश करत आहेत. 

दक्षिण मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती काय? 

2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं जिंकली. त्यावेळी शिवसेना मात्र एकसंध होती आणि शिवसेना-भाजपा युती होती. मात्र, आता शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 

दक्षिण मुंबईत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वरळीतून आदित्य ठाकरे (ठाकरे गटाचे आमदार), शिवडी अजय चौधरी (ठाकरे गटाचे आमदार), भायखळा यामिनी जाधव (शिंदे गटाच्या आमदार), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप आमदार), कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप आमदार) आणि मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस आमदार) असं बलाबल सध्या दक्षिण मुंबईत आहे. त्यात आता शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे मिलिंद देवरांनी जर शिंदे गटात प्रवेश केला, तर ते त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल, असं दिसतंय. 

दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. अशातच दक्षिण मुंबई लोकसभेसाठी मिलिंद देवरा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा ठरतील, हे मात्र नक्की. अशातच देवरांसाठी एक अडचणी मात्र नक्की असेल, ती म्हणजे, लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मिलिंद देवरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भलामोठा मराठी पट्टा कितपत स्विकारेल हा मोठा प्रश्नच आहे. लालबाग, परळ म्हणजे, एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येत वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे या पट्ट्यात देवरांना कितपत पसंती मिळेल हा प्रश्नच आहे. अशातच इथे मनसेनं उमेदवार दिला, तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं, एवढं मात्र नक्की. 

[ad_2]

Related posts