[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nagpur BJP Meeting : नागपुरात संघ आणि भाजपची सहा तासांची बैठक, नेमकं काय घडलं ? ABP Majha
नागपुरात संघ आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आज तब्बल सहा तास बैठक झाली. विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय? भाजपची स्थिती कशी आहे? निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचे बलस्थान काय? कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायचे आहे? या सर्व मुद्द्यांवर आज सखोल चर्चा झाल्याचं समजतंय. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी बैठक घेऊन आढावा घेण्यात आला होता.. त्याच पद्धतीने यावर्षीही लोकसभा निवडणुकांपूर्वी संघ परिवारातील सर्व संघटनांना एकत्रित बसवून आढावा घेतला जात आहे. पुण्यात रविवारी अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला होता.
[ad_2]