Indrayani River  Pollution Alandi Pune Pimpri Chinchwad Foamy Water Again In Indrayani River

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indrayani river pollution alandi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरलेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे. जे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा याला कारणीभूत ठरत आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात, परिणामी नदीची (Indrayani River Pollution Alandi) दयनीय अवस्था होते. एबीपी माझाने जानेवारी महिन्यात हा प्रकार समोर आणला होता त्यावेळी सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. 

इंद्रायणी नदीवर रसायनयुक्त पाण्याचा फेस तयार झाला आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या सगळ्या अनाधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यावेळी नागरिकांच्या मागणीला यश आलं होतं आणि या कंपन्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र अजूनही या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटलेला नाही.

लोणावळा शहरातून या इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदूषणामुळे नदीकाठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

येत्या 11 जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यामुळे त्या पूर्वी दोन दिवसांपासून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. दोन दिवस लाखो वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान असतं मात्र याच नदीचं पाणी अतिप्रमाणात प्रदूषित झालं आहे. 

नागरिकांच्या आरोग्याला धोका

लाखो नागरिक यात स्नान करतात. या नदीत रसायनयुक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदूषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. 

संबंधित बातमी –

Pune Indrayani River pollution : Majha Impact! इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकांवर गुन्हा दाखल

 

[ad_2]

Related posts