Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून ‘या’ 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mangal Surya Yuti 2023 in Singh formed Budhaditya and Vashi Rajyog : वैदिक पंचांगानुसार लवकरच सूर्य आणि मंगळ ग्रह आपले स्थान बदलणार आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव कर्क राशीतून बाहेर पडून स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशी आधीपासूनच मंगळ ग्रह (Mangal Surya Yuti 2023 in Singh) उपस्थित आहे. त्यामुळे दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होतो आहे. तर 18 ऑगस्टला मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच बुधही प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत असल्याने सूर्य आणि बुधाचा संयोग बुधादित्य राजयोग तयार करत आहे. (Mangal Surya Yuti 2023 in Singh formed Budhaditya and Vashi Rajyog 18 august 6 zodiac signs money and blessings)

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांना मंगळ गोचर अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. व्यापारी वर्गाला या काळात लाभ होणार आहे. कुटुंबात सुख आणि शांती लाभणार आहे. वैवाहित जीवनात आनंद असेल. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. शत्रूंवर मात करु शकणार आहात.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण फलदायी ठरणार आहे.  कार्य आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यशाची नवीन समीकरण जुळून येणार आहे. नवीन काम किंवा प्रकल्पासाठी हा काळ उत्तम आहे.  वैवाहिक जीवनात मधुरता वाढणार आहे.  नवीन मालमत्ता किंवा घर खरेदी करणार आहात. व्यवसायात यशसोबत आर्थिक फायदा होणार आहे. 

मीन (Pisces) 

या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायतून तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही हा व्यवसाय वाढविणार आहात. अविवाहितांना लग्नाची मागणी येणार आहे. बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.  आर्थिक लाभासह समाजात मान सन्मान मिळणार आहे. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. घरात शुभ कार्य घडणार आहे.  

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी यशासोबत प्रगती लाभणार आहे. अडकलेले पैसे परत तुम्हाला मिळणार आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अतिशय शुभ ठरणार आहे. व्यापार क्षेत्रात फायदा होणार आहे. एकाग्रता वाढल्यामुळे कामाच्या ठिकाणीही प्रगती होणार आहे. घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आणि साथ मिळणार आहे.  वैवाहिक जीवनात मधुरता वाढणार आहे. 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts