India Afghanistan 3rd T20 Match Bangalore Playing 11 Ind Vs Afg Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs AFG Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये बुधवारी तिसरा आणि अखेरचा टी 20 सामना (IND vs AFG 3rd T20) बुधवारी होत आहे. बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bangalore) दोन्ही संघ आमने-सामने असतील. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून भारत निर्वादित वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे शेवट गोड करण्यासाठी अफगाण फौज मैदानात उतरेल. 

भारत आणि  अफगाणिस्तान यांच्यामध्ये बुधवारी एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार आहे. भारतीय वेळानुसार, संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. अखेरच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान संघाची प्लेईंग 11 कशी असेल ते पाहूयात.. 

भारतीय संघात बदल होणार का ?

तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात टीम इंडियामध्ये महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. भारताच्या प्लेईंग 11 मध्ये आवेश खान, कुलदीप यादव यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्याशिवाय विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन यालाही संधी मिळू शकते. दुसरीकडे मुकेश कुमार, वॉशिंगटन सुंदर आणि जितेश शर्मा यांना आराम दिला जाऊ शकतो. 

अखेरच्या टी 20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर/कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार/आवेश खान

अफगानिस्तानची संभाव्य प्लेईंग 11 –

रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम जादरान (कर्णधार), गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी

मालिकेत भारताचे निर्वादित वर्चस्व – 

तीन सामन्याच्या टी 20 मलिकेत भारताने निर्वादित वर्चस्व गाजवलं. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात अफगाण संघाचा पराभव केला. भारताकडून शिवब दुबे याने अष्टपैलू कामगिरी केली. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रभावी मारा केला. कर्णधार रोहित शर्मा याला फलंदाजीत अपयश आले. दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झालाय. अखेरच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करण्याची संधी असेल. आयपीएलपूर्वी भारताचा हा अखेरचा टी 20 सामना असेल. 

आणखी वाचा :

हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा, टीम इंडियातील कमबॅक झालं कठीण!

कुणाच्या जाण्यानं फरक नाही पडत, हार्दिकनं गुजरात सोडल्यानंतर शामी पहिल्यांदाच बोलला

[ad_2]

Related posts