[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
MPSC Result : एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट (MPSC Merit List) जाहीर झाली असून त्यामध्ये विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते हिने बाजी मारली असून दिपा चांगदेव जेधे ही दुसरी आली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवेच्या 600 पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
राज्यसेवेच्या 600 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील सदाशिव पेठ आणि इतर परिसरात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
मुलांमधील पहिले तीन क्रमांक
1. पाटील विनायक नंदकुमार
2. बांगर धनंजय वसंत
3. गावंडे सौरव केशवराव
मुलींमधील पहिले क्रमांक
1. ताकभाते अनिता विकास
2. जेधे दिपा चांगदेव
3. म्हात्रे सोनाली अर्जुनराव
[ad_2]