Supriya Sule eligible for power But still kept away from power Sharad Pawar statement NCP Ajit Pawar marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे (बारामती) : “मला लोक सांगायचे ताई (सुप्रिया सुळे)  तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे. शरद पवारांनी काल बारामतीतील पदाधिकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी शरद पवार यांनी अजित पवार गटावर देखील जोरदार टीका केली आहे. 

यावेळी पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की,“ आजची लढाई विचाराची लढाई आहे. जे लोकं आज गेले आहे, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आणि ते आज भाजपसोबत गेले. सत्ता येते आणि जाते, ती सत्ता लोकांच्या जीवावरील असली पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी आणि सत्ताधारी असे दोन पक्ष असले पाहिजेत. लोकशाहीत एकच पक्ष असला तर तो हिटलरचा हुकूमशाहीचा पक्ष असतो. आपल्याला हुकूमशाहीचा पक्ष नको, आपल्याला लोकांचा पक्ष पाहिजे. सत्तेतला पक्ष काम करतो, विरोधी पक्ष लोकांमध्ये जाऊन काम करतो,” असे शरद पवार म्हणाले. 

काही भीतीपोटी, तर काही पदासाठी सोडून गेले

दरम्यान याचवेळी अजित पवार गटावर टीका करतांना शरद पवार म्हणाले की,“ आज जे आपले लोक सोडून गेले आहेत, त्यांना आपण सत्तेत राहण्याची संधी दिली की नाही?, आज तिकडच्या गटात म्हणजे अजित पवारांच्या गटात अनेकजण मनाने नाहीत पण भीतीने तिकडे आहेत. काहीजण मनाने नाहीत पण सत्तेसाठी आहे. काहीजण मनाने नाहीत पण पदामुळे तिकडे आहेत. काहीजण विचार मांडणी करू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

विरोधात प्रचार करणाऱ्यांचे हात थरथर कापेल…

याचवेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “लढाई करायला जिद्द लागते, जे लढाई करायला येणार आहेत त्यांची जिद्द गेली आहे. जो आपल्या विरोधात प्रचार करेल त्याचा हात थरथर कापेल आणि तो मनाला विचारेल कुणाच्या विरोधात आपण प्रचार करतोय. 1980 साली मी इंग्लंडला गेलो तेव्हा 70 होते, परत आल्यावर फक्त 6 जण राहिले. जे गेलं यांच्या जागी नवीन निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली? महाराष्ट्रमध्ये पोहोचवली कुणी? सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या खुर्चीवर बसवले कुणी? सगळ्या समाजाच्या लोकांना अनेकांना सत्तेतच्या खुर्चीवर बसवले. काही लोकांना जाणीवपूर्वक संधी द्यायची असती आणि दिली आहे. त्यांच्या काही चुका झाला तरीही आपण संधी दिली. मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले पण कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला, काहीना काही योगदान असेल ना?, असा प्रश्न देखील पवारांनी उपस्थित केला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

शरद पवारांचा सोलापूर दौरा, 19 जानेवारीला मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts