Kishori Pednekar Thackeray Group leader also got notice from ED in alleged covid body bag case detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना देखील ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

शुक्रवार 19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना देखील समन्स बजावण्यात आलंय. मागील अनेक दिवसांपासून याचसंदर्भात किशोरी पेडणेकर यांची चौकशी देखील सुरु होती. त्यामुळे आता यावर किशोरी पेडणेकर या काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आल्याचं पाहायला मिळत आहे. 

काय आहे प्रकरण?

किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. 

वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.

रोहित पवारांना ईडीची नोटीस 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. 

हेही वाचा : 

Rohit Pawar : रोहित पवार यांना ईडीची नोटीस,  24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts