पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – दीड एकर जागेवरील ऊस जाळून एक लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चिंचोशी येथे गुरूवारी (दि. १८) ही घटना घडली.
याप्रकरणी राम पांडूरंग भोसकर (वय २३, रा. चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीच्या गट नंबर ६९१ मधील दीड एकर जागेत त्यांची ऊसाची लागवड केली होती. हा ऊस काढणीला आला होता. मात्र अज्ञात इसमाने जाणीवपूर्वक ऊस जाळून फिर्यादी यांचे एक लाख रुपयांचे नुकसान केले. चाकण पोलिस तपास करत आहेत.