[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी काही वेळात मनोज जरांगे (Manoj Jarange) आंतरवाली सराटीमधून (Antarwali Sarathi) मुंबईकडे (Mumbai) निघणार आहे. मात्र, त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी सरकारवर शेवटचा डाव टाकला आहे. मनोज जरांगे यांच्या या एका वक्तव्याने सरकारची अडचण वाढणार आहे. कारण मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. यावेळी मुंबईकडे निघतांनाच आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे सरकारची मोठी अडचण वाढू शकते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असून, आजपासून मनोज जरांगेसह लाखो मराठे मुंबईकडे कूच करणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकडे जाताना अंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. जर, उपाशीपोटी आंदोलकांनी मुंबईपर्यंत प्रवास करणं शक्य नाही, आणि तसं झाल्यास काही दुर्दैवी घटना घडू नये अशी अपेक्षा आहे. मात्र जरांगे यांचे या घोषणेमुळे सरकारची अडचण वाढणार आहे.
अधिक पाहा..
[ad_2]