morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 20th January 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील… 

Ram Mandir : उद्योगपती आणि खेळाडूंसोबतच ‘या’ सेलिब्रिटींनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण, पाहा संपूर्ण यादी

Ram Mandir Inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya) 22 जानेवारीला रामललाचा (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरातील रामभक्त या क्षणाची वाट पाहत आहे. देशभरातील संत-महंत, कलाकार, नेते मंडळीसह उद्योगपतींना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजरमान झाले आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्वांना प्रभू श्रीरामाच्या मनमोहक रुपाचं दर्शन होणार आहे. वाचा सविस्तर…

Prabhas on Ram Mandir : प्रभासने राम मंदिरासाठी दिली 50 कोटी रुपयांची देणगी? प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील जेवणाचा खर्च उचलणार; समोर आलं सत्य

Prabhas Donate 50 Crores for Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. अशातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने (Prabhas) राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी 50 कोटी रुपये दान केल्याची चर्चा आहे. तसेच या सोहळ्यादरम्यान जेवणाचा खर्चही अभिनेता उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे. वाचा सविस्तर…

Weather Update : थंडीचा जोर वाढला! मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट, IMD चा अंदाज काय सांगतो?

Weather Update Today : देशात पुढील काही दिवस थंडीची लाट (Cold Wave) कायम असणार आहे. सध्या देशातील तापमानात घट झाली असून मुंबई, ठाणे, कोकणात गारठा वाढला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत उत्तर भारतात दाट धुके आणि तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर…

IPL 2024 : TATAचं आयआयपीएलचा टायटल स्पॉन्सर, 5 वर्षांसाठी 2500 कोटी रुपयांची बोली; BCCI च्या खजिन्यात भर

Tata Group IPL Title Sponsor : टाटा समूह (Tata Group) पुढील पाच वर्षे आयपीएलचा (IPL 2024) टायटल स्पॉन्सर (Tata Group IPL Sponsor) राहणार आहे. टाटा सन्सने (TATA Sons) 2028 पर्यंत आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप (IPL Title Sponsorship) मिळवली आहे. या कालावधीत टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी 50 कोटी रुपये देणार आहे. टाटा सन्सने आयपीएल 2024 ते 2028 च्या टायटल प्रायोजकत्वासाठी (IPL Title Sponsor) दरवर्षी 500 कोटी रुपये म्हणजेच एकूण 2500 कोटी रुपयांची बोली लावली आहे.  वाचा सविस्तर…

Mutual Funds : फक्त 500 रुपयांपासून सुरुवात, ‘एवढ्या’ वर्षात जमा होतील 21 लाख रुपये; असं करा गुंतवणुकीचं नियोजन

Mutual Funds Power of SIP : सध्या एसआयपी (SIP) हा गुंतवणुकीचा पर्याय (Investment Plan) ट्रेंडमध्ये आहे. बहुतेक लोक एसआयपीद्वारे  म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देताना दिसतात. तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दीर्घकाळ पैसे गुंतवल्यास, तुमच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जमा करु शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एसआयपीमध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. वाचा सविस्तर…

20 January In History : आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण, ‘सरहद गांधी’ यांचा मृत्यू, इतिहासात आज

On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 20 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आली होती. सरहद गांधी आणि बादशाह खान या नावाने प्रसिद्ध खान अब्दुल गफार खान यांचं आजच्या दिवशी 1988 साली निधन झालं होतं. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी आजच्याच दिवशी झाला होता. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर…

Horoscope Today 20 January 2024 : आजचा शनिवार खास! कोणत्या राशींवर असेल शनिदेवाची कृपा? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 20 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 20 जानेवारी 2024 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज कर्क राशीच्या लोकांनी कोणाशी वाद घालू नका, कन्या राशीच्या लोकांचे आज कोणत्याही कामाची काळजी करू नका. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर…

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts