[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sanjay Raut नाशिक : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir inauguration) लोकार्पण सोहळा होणार आहे. अभिनेते, अभिनेत्रींना खास आमंत्रण दिले जाते. ठाकरे कुटुंबाचा राम मंदिर लढ्याशी जवळून संबंध होता. त्यांना तुम्ही अशा प्रकारे वागवत आहात. त्यामुळे तुम्हाला प्रभू रामचंद्र हे शाप देतील, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला नाशिकमध्ये (Nashik News) लगावला.
संजय राऊत म्हणाले की, नाशिकची टीम मजबूत आहे, अत्यंत उत्तम प्रकारे काम सुरू आहे. नाशिकमध्ये 22 आणि 23 ला धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही उत्सव होत आहेत. 22 तारखेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाशिकमध्ये आगमन होईल. भगूरला जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते आदरांजली वाहतील. पंतप्रधान सावरकरांना विसरले असतील. त्यांचे रोड शो झाले. पण त्यांना सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विस्मरण झाले, असा टोला त्यांनी यावेळी लगावला
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे काळाराम मंदिरमध्ये जातील आणि रामकुंडावर जाऊन गोदेची आरती करतील. 23 तारखेला सकाळी 10 वाजता आमचे अधिवेशन सुरू होईल. 1 हजार 700 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहतील. संध्याकाळी खुले अधिवेशन होईल म्हणजे जाहीर सभा उद्धव ठाकरे घेतील, असेही संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंचे नाशिकवर विशेष प्रेम
23 जानेवारीला मुंबईला दरवर्षी हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी येतात. यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, संपूर्ण राज्य नाशिकला येणार आहे. त्यामुळे आम्ही इथूनच बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करू. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
…म्हणून आमच्या लोकांवर कारवाई
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाई सुरु आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, रामाची पूजा करतात आणि रावणाचे राज्य सुरू आहे. जनता न्यायालय मुंबईत झाल्यावर त्यांचे बुरखे फाटले आहेत. या जनता न्यायालयामुळे त्यांचे तीळपापड झाले आहे. त्यामुळे आमच्या लोकांवर कारवाई सुरू आहे. शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काय संबंध आहे. रामायणामध्ये ज्यांचे वध रामाने केले अशी ही पात्रं आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आणखी वाचा
Nashik Kalaram Mandir : पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरे नतमस्तक, राजकीयदृष्ट्या महत्व आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास काय?
अधिक पाहा..
[ad_2]