नराधमाने महिलेचे तुकडे कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मिरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे.

आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 36 वर्षीय महिलेच्या शरिराचे तुकडे करून ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

घरातील सर्व साहित्य जप्त

आरोपी मनोज साहानी हा लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता अशीही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी मनोज याला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे.

घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पोलीस मनोज यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना फक्त महिलेचे पाय दिसले. आरोपी मनोज सहानी (56) याला त्याच्या फ्लॅटमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली.

महिलेचा  खून करुन मृतदेहाचे तुकडे करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दुर्गंधी आल्याने प्रकरण उगडकिस

नया नगर पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला सरस्वती वैद्य ही मनोज सहानी याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मिरारोड येथील गीता नगर येथे हे जोडपे तीन वर्षांपूर्वी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना इमारतीतील रहिवाशांचा फोन आला. त्यांनी फ्लॅट क्रमांक 704 मधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.

पोलीस फ्लॅटवर पोहोचल्यावर सहानी यांने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले.


हेही वाचा

मिरा रोड : लिव्ह इन पार्टनर ने केली महिलेची हत्या आणि मग शरीराचे तुकडे

[ad_2]

Related posts