Mumbai two die while running in the tata marathon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (heart attack) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे. या व्यक्तीने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. 

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सुवर्णदीप बॅनर्जी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एनएससीआय, वरळीजवळ धावत असताना तो कोसळला होता. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजलेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये. सदर व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय.

दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबई येथे मॅरेथॉन आयोजित केली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी सावळा गोंधळ पहायला मिळाला. स्पर्धा संपल्यानंतर काही धावपटूंना मेडल मिळाली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे काहीवेळ धावपटूंनी गोंधळ देखील घातला होता. त्यामुळे मेडल काऊंटरला छावणीचं स्वरुप देण्यात आलं होतं.

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतही रामनामाचा गजर झाल्याचं दिसून आलं. श्रीरामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे खांद्यावर घेऊन काही धावपटू धावले. मॅरेथॉनच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ‘जय श्रीराम’चा जयघोष सुरू असल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान,  टाटा मुंबई मॅरेथॉनचे 19 वे वार्षिक आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. यात 59 हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसटी येथे हिरवा झेंडा दाखवला होता. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts