Ayodhya Ram Mandir Idol Made of Krishna Shila Specicality of this Stone know all details about statue shri ram murti what is Krishna Shila marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shri Ram Mandir Idol Made of Krishna Shila Stone : 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्रभू श्रीराम रामाची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) संपन्न झाली आहे. 500 वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचं राम मंदिरात आगमन झालं आहे. न भुतो न भविष्यती असा भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला. डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक दशकं वाट पाहिली आणि अखेर तो क्षण आला. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाची बालस्वरुपातील मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला शुभ मुहूर्तावर विधीवत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. बालस्वरुपातील प्रभू श्रीरामाची मूर्ती अतिशल मनमोहक आणि लोभस आहे.

कृष्ण शिलेपासून साकारली प्रभू रामाची मूर्ती

भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य लक्ष वेधून घेत आहे. प्रभू श्रीरामाची ही मूर्ती काळा दगडापासून बनवण्यात आली आहे. या काळ्या रंगाच्या दगडाची खासियत काय, मूर्तीसाठी हा दगड का निवडण्यात आला हे तुम्हाला माहिती आहे का, नसेल तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

बालस्वरुपातील काळ्या रंगाच्या मूर्तीची खासियत

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली प्रभू श्रीरामाची बालस्वरूपातील मूर्ती मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती एकाच दगडात साकारण्यात आली आहे. ही मूर्ती काळ्या रंगाच्या खास दगडात कोरली आहे. या मूर्तीसाठी खास दगडाची निवड करण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या बालस्वरुपातील मूर्तीसाठी कृष्ण शिला (Krishna Shila) दगडाचा वापर करण्यात आला आहे.

कृष्ण शिला खडक कुठे सापडला? 

मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड कृष्ण शिला आहे, हा दगड कर्नाटकातील (Karnataka) मैसूर (Mysore) येथील हेग्गाडादेवनकोटे (Heggadadevanakote) म्हणजेच एचडी कोटे (H.D.Kote) तालुक्यातील गुज्जेगौदनापुरा (Gujjegowdanapura) येथे सापडला होता.

कृष्ण शिला खडक कसा सापडला? 

श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील विलोभनीय श्रीरामाच्या मूर्तीसंदर्भात शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी सांगितलं की, एचडी कोटे तालुक्यातील हरोहल्लीजवळील गुज्जेगौदनपुरा येथे रामदासांच्या शेतजमिनीत कृष्ण शिला दगड सापडला होता. याचा वापर भगवान श्रीरामाच्या बाल स्वरूपातील मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला. श्रीनिवास नावाच्या व्यक्तीला या जमिनीत खाणकामाची परवानगी मिळाली होती. खोदकाम सुरू असताना त्यांना दुर्मिळ कृष्णा शिला दगड सापडले. फेब्रुवारी 2023 मध्ये कृष्ण शिला दगड सापडले. यावेळी अरुण योगीराज आणि टीम श्रीरामाच्या मूर्तीसाठी दगड शोधत होते.

जमिनीचे मालक रामदास यांनी अरुण योगीराज यांच्या वडिलांना कृष्ण शिला दगड सापडल्याची माहिती दिली. यानंतर अरुण योगीराज यांनी तत्काळ शिल्पकार मनैया बडिगर आणि सुरेंद्र शर्मा यांना याबाबत सांगितलं आणि त्या ठिकाणी जाऊन दगडांची तपासणी केली असता ते दगड कृष्ण शिला असून मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचं समजलं. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2023 रोजी 17 टन वजनाचे पाच कृष्ण दगड अयोध्येला पाठवण्यात आले. खोदकामाचं काम सांभाळणारे श्रीनिवास यांनी मूर्तीसाठी कृष्ण शिला दगड मोफत दिले.

कृष्ण शिलेची खासियत काय? 

कृष्ण शिला हा दगडाला बोलीभाषेत बालापद कल्लू असंही म्हणतात. हा दगड फक्त 9X9 इंच किंवा 1X1 फूट चौरस आकारात सापडतो. हा दगड अतिशय गुळगुळीत असतो. निळा किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्ण शिला असं म्हटलं जातं. कृष्ण शिला ही ऍसिड प्रूफ, वॉटर प्रूफ, फायर प्रूफ आणि डस्ट प्रूफ दगड आहे. हा दगड लोखंडापेक्षा मजबूत आहे. हा दगड कोणत्याही घटकास संवेदनशील नाही. ऊन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही. हा दगड सुमारे 1000 हून अधिक वर्ष जशास तसा राहतो.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts