Manoj Jarange Mumbai March Saffron flags were hoisted on Madrasas Mumbai Rally Maratha Reservation marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले असून, बाराबाभळी येथील मदरशात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. विशेष म्हणजे जरांगे यांच्या याच दौऱ्याचा पार्श्वभूमीवर बाराबाभळी येथील मदरशावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले होते. एखाद्या मदरशावर पहिल्यांदाचा भगवे झेंडे पाहायला मिळाले. त्यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे. तर, मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले असून, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर मुस्लीम आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान यावर पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “मदारशावर मुस्लिम बांधवांकडून भगवे झेंडे लावण्यात आले होते. कालचा दुसरा दिवस होता आणि आज तिसरा दिवस आहे. कामं सोडून मराठा समाज रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. मुस्लिम बांधवांनी कालची व्यवस्था केली, हिंदू मुस्लिम एकोपा गरजेचं आहे. लोकशाही राज्य असून, प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. धर्म विषय वेगळा आणि मागणी वेगळी आहे. मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी पाठिंबा दिला. पहिल्यांदा मदरशावर भगवा झेंडा पाहायला मिळाला. इथे भगवा झेंडा आणि मनोज जरांगे आहे. इथे फक्त मुस्लिम नाही तर हिंदू मुलं सुद्धा शिकतात, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

धनगर-मुस्लीम आरक्षण कसं मिळत नाही पाहतो…

मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या मुस्लीम आरक्षणावर बोलतांना जरांगे म्हणाले की,“एकदा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मिटू द्या, मग धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं मिळत नाही ते बघतो. त्यांनी साथ दिली, नाही दिली तरी पाठिंबा आहे. धनगर बांधवांना सुद्धा आरक्षण मिळवून द्यायचं आहे, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

मुख्यमंत्र्यांवर प्रतिक्रिया…

मनोज जरांगे यांनी आपलं मुंबई आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “माझी त्यांना विनंती आहे, अडचण सरकार आणि प्रशासनाकडून होत आहे. त्यांनी ओळखून घ्यावं की, गावागावात लाखोने समाज एकवटला आहे. उभा राहायला सुद्धा जागा नाहीये. तुम्ही चर्चेसाठी दार बंदची भाषा करता. मुंबईच्या गल्लीत गल्लीत आणि राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर मराठेच असणार आहे, त्यामुळे 26 तारखेच्या आधी आरक्षणाचा निर्णय घ्यावा असे जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

आरक्षण घेऊन आल्यास अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारतो: मनोज जरांगे

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts