Pimpri Chinchwad Fire breaks out in woodshed two brothers died Pune Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pimpri Chinchwad Fire:  पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)  लाकडाच्या वखारीला भीषण आग (Fire)  लागली आहे.  आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधल्या वाल्हेकरवाडी येथे ही  घटना घडली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे.  या घटनेनंतर परिसरत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 ललित अर्जुन चौधरी  (21 वर्षे)  आणि कमलेश अर्जुन चौधरी (23 वर्षे)  या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. स्थानिक रहिवाशांनी दीलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग आणि धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेडमध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध झाल्या.  आगीत पोटमळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.

आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू

परिसरातील रहिवासी सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली. आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी  बादलीच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याच प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं. आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय झाले?

पत्र्याच्या  शेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते.  प्रथमदर्शी पाहणी केली असता माहिती मिळाली की, पहिले गोडाऊनमध्ये लाकडाची वखार आणि  हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे  तसेच   स्विफ्ट गाडी यांनी पेट घेतले होते.  दुसऱ्या गोडाऊनमध्ये अल्युमिनियमच्या फ्रेम  आणि दोन टू व्हीलर तसेच दोन व्यक्ती आगीच्या धुरामुळे  (कार्बन डाय-ऑक्साइड तथा कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूमुळे) झोपेतच असताना त्या शेडमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेशुद्ध होऊन पोटमाळ्यावर पडून राहिल्याने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मृत्युमुखी झाले असल्याचे आढळून आले. फायर होज व होज रील होजच्या साह्याने पाण्याच्या लाईनद्वारे आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझविली. सदर परिसरातील लगतच्या अन्य निवासी इमारतीमधील सर्व रहिवासांना पोलिसांच्या मदतीने इमारती बाहेर सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्यात आले. 

हे ही वाचा :

Nagpur Fire : नागपुरात अग्नितांडव, घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts