Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग ‘या’ राशींना करणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Mangal And Venus Conjunction In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रह एका राशीतून दुसऱ्या जेव्हा जेव्हा प्रवेश करतो त्याचा परिणाम 12 राशींवर पडतात. काही राशींसाठी हे गोचर शुभ असतं तर काहींसाठी घातक असतं. फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत तीन ग्रहांचा संयोग होणार आहे. त्यातून त्रिग्रही योगाची निर्मती होणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर धन आणि वैभवाचा दाता शुक्र, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग मकर राशीत एकत्र भेटणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण या त्रिग्रही योग 3 राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक फायदासह करिअरमध्ये यश आणि समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. (Trigrahi Yog Conjunction of Mercury Mars and Venus after 50 years in Capricorn Prestige with immense money to these zodiac signs)

मेष रास (Aries Zodiac) 

त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या कर्म घरावर हा योग निर्माण होणार असल्याने या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहेत. त्याच वेळी, तुमच्या नोकरीत बढती मिळणार आहे. तसंच तुम्हाला वडील आणि वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होणार आहे. तर नोकरदार लोकांना कनिष्ठ आणि वरिष्ठांचं सहकार्य लाभणार आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ही योग वेळ आहे.

धनु रास (Sagittarius Zodiac)

त्रिग्रही योग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या घरावर हा योग निर्माण होणार आहे. म्हणून, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. तसंच तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरीत बदलाचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तर यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार असून कामात यश मिळणार आहे. तसंच व्यावसायिकांना अडकलेले पैसे परत मिळणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)  

त्रिग्रही योग तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे कारण हा योग तुमच्याच राशीत निर्माण होणार आहे.  या योगामुळे तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तुमचा आत्मविश्वासही वाढणार आहे. तीव्रता आणि प्रभाव दोन्हीमध्ये वाढ होणार आहे. तसंच तुमची सर्व सरकारी कामं पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात फायदा होणार आहे. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. तसंच, यावेळी तुमच्या जोडीदाराची प्रगती होणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार असून तुम्हाला अनेक लाभ मिळणार आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts