pune pimpri chinchwad crime news in hadapsar area 6 persons including criminal were- arrested in two gangs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं (Pune Crime news) नाव  घेत नाही आहे. त्यातच हडपसरमध्ये दोन टोळ्यांमध्ये राडा झाला आहे. दोन टोळ्या एकमेकांवर भिडल्याचं बघायला मिळालं. दोन्ही टोळीने एकमेकांवर दगडफेक करुन परिसरातील गाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी  25 ते 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका सराईत गुन्हेगाराचादेखील समावेश आहे. हडपसपमधील गोसावी वस्तीमधील सुरक्षानगर रोडवर घडला आहे. दोन्ही टोळ्यांनी परस्परांविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. 

याबाबत सुरुवातीला राम राजू लाकडे (वय-20 रा. वैदवाडी, हडपसर) याने या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुनसराईत गुन्हेगार रोहन गायकवाड याच्यासह रोहित गायकवाड, अमित दुधाने, रोहन दोडके, राहुल गायकवाड, शुभम खिलारे आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

राम लाकडे हा पुण्यातील हडपसर परिसरात मित्रांसोबत लाडू वाटत होता. यावेळी काही लोकांनी त्याला आडवी गाडी घातली आणि हा आमचा परिसर असल्याचं आरोपींनी राम लाकडे आणि त्याच्या मित्राला सांगून शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. एकमेकांना शिवीगाळ केली आणि डोक्यात दगड मारुन जखमी केले. जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर हाणामारी केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 

दुसऱ्या टोळीकडून अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणी रोहन गायकवाड यानेदेखील विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रोहन गायकवाड भाऊ वस्तीमधील मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी राम आणि सगळे यांनी थेट परिसरात फटाके वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी दोघांमध्ये जातीवरुन शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावरुन पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. रोहन भारत गायकवाड (वय-21 रा. गोसावी वस्ती, हडपसर) याने दिलेल्या तक्रारीवरुन विशाल शिंदे, रोहित शिंदे, ओमकार शिंदे, प्रकाश लाकडे, प्रभाकर पवार, मारुती पवार, राहुल लोखंडे, सारंग लोखंडे, अक्षय पवार, अजय पवार, आकाश ठाकूर, शुभम पवार, तुषार रेड्डी, आदित्य शिंदे, छोटू शिंदे, राम लाकडे, अशोक लाकडे, राजू शिंदे, अशोक शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करुन रोहीत शिंदे, मारुती पवार आणि राम लाकडे यांना अटक केली.

इतर महत्वाची बातमी-

Anand Mahindra Thar Video : Mahindra Thar चालवत एका मुलीनं असं काही केलं की थेट आनंद महिंद्रा झाले भलतेच खूश, म्हणाले याच साठी….

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts