modi vs manmohan government whose rule were most bharat ratna awarded see list

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharatratna Award : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बाहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन-नायक असं म्हटलं जायचं. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतलेला हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल, हा भारतरत्न पुरस्कार कर्पुर ठाकूर यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख असून समाजात एकोपा वाढीस लागेल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

कोणाच्या काळात किती भारतरत्न?
कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Modi Government) आणि मनमोह सिंग सरकारच्या (Manmohan Government) काळात किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे. 2014 मध्ये मोदी सरकार केंद्रात सत्तेत आलं. याच वर्षी देशातील दोन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. यातलं एक नाव होतं महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दुसरं नाव होतं वैज्ञानिक नागेश रामचंद्र राव म्हणजेच सीएनआर राव. पण सचिन तेंडुलकर आणि सीएनराव यांना भारतत्न पुरस्कार देण्याची घोषणा काँग्रेस काळात झाली होती. 

केंद्रात 2004 ते 2014 अशी दहा वर्षा मनमोहन सिंग सरकार केंद्रात होतं. या काळात तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यात  पंडित भीमसेन जोशी (2008), सचिन तेंडुलकर (2014) आणि सीएनआर राव (2014) यांचा समावेश आहे. तर मोदी सरकारच्या काळात सहा जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

अटल बिहारी वाजपेयींपासून सुरुवात
मोदी सरकारने पहिल्यांदा भारतरत्नची घोषणा 2015 मध्ये केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना हा सन्मान मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित केलं होतं. याच वर्षी स्वातंत्र्यसेनानी आणि हिंदू महासभेचे नेते मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 

2019 मध्ये पुरस्कारावरुन चर्चा
2019 मध्ये मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कारासाठी 3 नावांची घोषणा करण्यात आली. यात प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांचा समावेश होता. या तीन नावात सर्वाधिक चर्चा झाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाची. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर काँग्रेसची भूमिका काय असणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. पण प्रणव मुखर्जी यांना भारत्नरत्न पुरस्कार देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केलं. पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची विचारधारा असलेल्या प्रणव मुखर्जी यांचा सन्मान अभिमानास्पद असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. 

मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक
23 जानावेरी 2023 मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. मोदी सरकारचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जातंय. या घोषणेने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाने बिहारमधल्या मागासवर्गीयांना आकर्षित केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम पाहिला मिळणार आहेत. 

Related posts