Yavatmal News ertiga car and truck accident on Vani Maregaon road of Yavatmal One person was killed on the spot and two others were seriously injured marathi news maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yavatmal Accident : यवतमाळच्या वणी- मारेगाव मार्गावरील निंबाळा उतारावर अर्टिगा कार आणि ट्रकचा भीषण अपघात(Accident) झाला. यात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने अर्टिगा सुमोला जबर धडक दिली. या अपघातात अर्टिगा वाहनातील वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला असून प्रवाशी आणि ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत. नवाज मुझफ्फर शेख असे 30 वर्षीय अर्टिगा चालक मृतकाचे नाव आहे. मृतक नवाज हा आपल्या वाहन क्रमांक (MH -13- DE -7906) ने चंद्रपुरला जात होते तर सिमेंटची वाहतुक करणारा ट्रक क्रमांक (MH -34-BG- 1337) हे भरधाव वाहन वणीवरुन मारेगावच्या दिशेने जात असतांना ही अपघाताची घटना घडली.

प्रवाशी आणि ट्रक चालक गंभीर जखमी 

या भीषण अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी जखमींना मदत करत या बाबत माहिती पोलिसांना दिली. माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.  जखमींमध्ये मृतकाची आई, मोठ्या भावाचे दोन लहान मुले, वहिनी आणि मित्र कमल शेख यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या घटनेची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

अशीच एक घटना आज 24 जानेवारीच्या पाहाटे अडीच वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात घडली. ज्यामध्ये तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-एसटी बस आणि इको गाडी यांच्यामध्ये ढवळपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. मुंबईकडून नगरकडे येणाऱ्या एसटी बसने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या इको गाडीने एसटी बसला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. 

सहा जणांचा मृत्यू

तर, या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतांना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts