google pixel 8 update bring circle to search body temperature feature in phone

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Pixel 8 : Pixel 8 आणि Pixel 8 Pro मध्ये (Pixel 8) खास फिचर्समध्ये अपडेट मिळणार आहे. या अपडेटमुळे (Smartphone) गुगल पिक्सलच्या या फोनमध्ये सर्कल टू सर्च, बॉडी टेम्परेचर चेक, मॅजिक कंपोज असे अनेक खास आणि आकर्षक फिचर्स असतील. या फोनमध्ये येणाऱ्या खास फिचर्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. हे भन्नाट फिचर आता घरातील अनेक गॅजेट्सची जागा घेणार आहे आणि हे फिचर प्रवासातदेखील चांगलेच कामात येणार आहे. 

Pixel 8 आणि Pixel 8 Pro मध्ये येणारे फिचर्स म्हणजे सर्कल टू सर्च, जे सॅमसंगने नुकत्याच लाँच केलेल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन  Samsung Galaxy S24 Series मध्ये सादर केले. सर्कल टू सर्च एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स फिचरच्या मदतीने काम करते. या फिचरच्या मदतीने युजर्स सर्कलद्वारे सर्च करू शकतात, हायलाइट करू शकतात, स्क्रिबल करू शकतात किंवा डिस्प्लेमध्ये दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर टॅप करू शकतात. हे फिचर 31 जानेवारीपासून Pixel 8  सीरिजमध्ये सामील होणार आहे.

Pixel 8 अनेक खास फिचर्स

या व्यतिरिक्त गुगल पिक्सेल अखेर जानेवारी 2024 फीचर ड्रॉपमध्ये येत आहे. ज्यामुळे युजर्स पिक्सेल 8 सीरिज शरीराचे तापमान मोजू शकतील. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा बार कपाळासमोर आणून स्क्रीनवर टॅप करावा लागेल आणि मग तुम्हाला तुमच्या शरीराचे तापमान कळेल. याचा अर्थ तुम्ही स्वत: तुमच्या शरीराचं तापमान जाणून घेऊ शकाल.

फोटोमोजी आणि ऑडिओ स्विच फिचर

दुसरे फिचर फोटोमोजी आपल्या फोटोंचा वापर करून स्टिकर्स आणि प्रतिक्रिया तयार करण्यासाठी वापर करु शकतो. हे जुन्या पिक्सेल डिव्हाइसवर देखील उपलब्ध आहे. गुगलने सांगितलंय की नियर शेअर फीचर आता सर्व पिक्सेल डिव्हाइसवर क्विक शेअर म्हणून वापरलं जाईल.  गुगलचे ऑडिओ स्विच फीचर आता पिक्सल वॉच आणि पिक्सल वॉच2 वर उपलब्ध आहे. म्हणजेच तुमच्याकडे पिक्सल बड्स प्रो इयरबड असेल तर तुम्ही पिक्सल वॉच, पिक्सल वॉच 2, पिक्सल टॅब्लेट आणि पिक्सल स्मार्टफोनसारख्या डिव्हाइसवर सहज ऑडिओ स्विच करू शकता. त्यानंतर पिक्सल 5 A मध्येही हे फिचर देण्यात येणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Voter Id Card Online : राष्ट्रीय मतदार दिन : अजूनही मतदार कार्ड बनवले नसेल तर घरबसल्या करा अर्ज, फक्त 5 मिनिटं लागतील!

Mobile Scrapping Policy : 5वर्षे जुना फोन बंद होणार? सरकारची नवी मोबाइल स्क्रॅप पॉलीसी, सोशल मीडियावर फिरत असलेल्या ‘त्या’ मेसेज मागचं सत्य काय?

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts