Sanjay Raut Slams CM Eknath Shinde Satara Farm Visit Manoj Jarange Maratha Reservation Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  नेतृत्वाखालील मराठा मोर्चा (Maratha Morcha)  मुंबईच्या वेशीवर  येऊन धडकला आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय.तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल.  राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते माहित नाही. परंतु  त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले, तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल.  मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे.  हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे.  राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहीत नाही.  त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत.  हे खोके वाटप करायला ठीक आहे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे.

भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या जात आहे : संजय राऊत

 गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या जात आहे. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायलय आणी निवडणूक आयोग काम करत आहेत. आमचा विरोध हा हुकूमशाहीला आहे संविधान नहीं हम करे सो कायदा संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करीत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

हिंदू मुस्लमानांच्या दंगली करून  400 पारचा  नारा : संजय राऊत

 भाजपाची 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना दंगली घडविण्याची  कटकारस्थान आहे.  हिंदू मुस्लमानांच्या दंगली करून यांचा 400 पार नारा दंगलीच्या आगीतून आला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

महविकास आघाडीत कुठलाही मतभेद नाही: संजय राऊत

महविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, जवळजवळ दृष्टीपथावर तोडगा आलेला आहे.  आठ ते नऊ तास आम्ही काल चर्चा केली.  आमच्यात कुठलीही मतभेद नाहीत. 30  तारखेला वंचीत देखील आमच्या चर्चेत सहभागी होईल.  चेहरा पक्ष आणि खाली असलेल्या कार्यकर्त्यांचं केडर या तीन सूत्रांचा वापर आम्ही जागा वाटपा संदर्भात करत आहोत. मुंबईबाबत नंतर चर्चा करणार आहे. 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts