shoaib malik Sania mirza : … आणि हतबल सानियानं मुलासह गाठला भारत; जगणं कठीण झालेलं म्हणत मांडली व्यथा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

shoaib malik Sania mirza son : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला आणि अखेर शोएबच्या तिसऱ्या निकाहचे फोटो व्हायरल झाले आणि या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. सानिया आणि शोएब वेगळे झाले असून, त्यांच्या नात्यात आता सांगण्याबोलण्यासारखं काही उरलच नसल्याचं यावेळी अधिकच स्पष्ट झालं. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत नव्या आयुष्याची सुरुवा केलेली असतानाच सानियाच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचच लक्ष लाहलं होतं. 

नात्यांची ही गुंतागुंत आता आणखी वाढली असून, या साऱ्यामध्ये शोएब आणि सानियाचा मुलगा इजहान याचाही उल्लेख होताना दिसत आहे. 2018 मध्ये या जोडीच्या नात्यात या चिमुकल्याचं आगमन झालं. आता हाच इजहान त्याच्या आई- वडिलांना विभक्त झालेलं पाहून खचला असून, त्याला परिस्थिती समजवून सांगणं किंवा त्याच्याकडून तशी अपेक्षा ठेवणंही सानिसाठी आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. 

लहानग्या इजहानला काहीच कळेना… 

सूत्रांच्या माहितीनुसार शोएब आणि सानियाच्या विभक्त होण्यानंतर त्यांचा मुलगा इजहान याला मात्र त्यांच्यामध्ये नेमकं काय सुरुयेत, ते विभक्त झाले आहेत ही बाब पचवताच येत नाहीये. पाकिस्तानातील स्थानिक वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची माहिती जाहीर झाल्यानंतर इजहान तीन- चार दिवस शाळेतही गेला नव्हता. 

तिथं शाळेत जाणं टाळणंच नव्हे, तर इजहानच्या वागम्यामध्येही याचे परिणाम दिसून येऊ लागले. अखेर हतबल सानिया मिर्झानं तिच्या लेकासह भारतात येण्याचा निर्णय घेतला. शाळेमध्ये मित्र बरंवाईट बोलत असल्यामुळं इजहान बराच खचला होता, त्याची खिल्ली उडवली जात होती. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार ज्या दिवशी शोएब आणि सनाचा निकाह पार पडला त्या दिवशी इजहान 18 सूरते कुराचा हिज्फ करून मोकळा झाला होता. अर्थात त्यानं कुराण पठण केलं होतं. तिथं शोएब निकाहच्या आनंदात असतानाच इथं सानिया मात्र लेकाला कुराणची शिकवण देत होती. सानियाला शोएबसोबतच्या या नात्यातून फक्त मनस्ताप झाला असला, तरीही त्याच्या कुटुंबीयांनी मात्र तिची साथ सोडली नव्हती. 

कुटुंबाची साथ असली तरीही ज्या व्यक्तीला साता जन्माचा साथीदार म्हणून निवडलं होतं त्यानं मात्र विश्वासघात करत नव्या आयुष्यावर पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं सानिया खचली आणि तिनं या परिस्थितीमध्ये मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. 

Related posts