Richest countries in world Which are the 10 richest countries in the world marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Richest countries : जगातील सर्वात श्रीमंत देश (Richest countries) कोणता? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत देशांची माहिती देणार आहोत. श्रीमंत देशांच्या यादीत भारत (India) कितव्या स्थानी आहे, याबाबतची देखील माहिती आपण पाहणार आहोत. जगातील अनेक श्रीमंत देश हे जगातील सर्वात लहान देश आहेत. महामारी आणि आर्थिक मंदीचा या देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात श्रीमंत देश

जगातील पहिल्या 10 श्रीमंत देशांच्या यादीत आशियातील 4 आणि युरोपातील 5 देशांचा समावेश आहे. पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग (Luxembourg) हा छोटासा देश जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनीने वेढलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लक्झेंबर्ग हा युरोपमधील 7वा सर्वात लहान देश आहे. येथील लोकसंख्या केवळ 6.50 लाख आहे. लक्झेंबर्ग सरकार (Luxembourg Govt) देशाच्या संपत्तीचा एक मोठा भाग आपल्या लोकांना चांगल्या घरांच्या सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्यासाठी खर्च करते. लक्झेंबर्ग हा एक विकसित देश आहे. ज्या ठिकाणी GDP दरडोई उत्पन्न सर्वाधिक 143,320 डॉलर आहे.
लक्झेंबर्ग हा युरोपियन युनियन, युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन, NATO आणि OECD चा संस्थापक सदस्य आहे.

जगातील 10 श्रीमंत देश कोणते?

लक्झेंबर्ग –   प्रति व्यक्ती GDP 143320
आयर्लंड  –   प्रति व्यक्ती GDP 137640
सिंगापूर  –    प्रति व्यक्ती GDP 133110
कतार –        प्रति व्यक्ती GDP 144210  
मकाओ SR – प्रति व्यक्ती GDP  98160
स्वित्झर्लंड  –   प्रति व्यक्ती GDP  89540
यूएई  –           प्रति व्यक्ती GDP  88960 
सैन मारिनो –    प्रति व्यक्ती GDP  84140
नॉर्वे –            प्रति व्यक्ती GDP  82240
यूएसए –         प्रति व्यक्ती GDP  80410

सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत 129 व्या स्थानावर

हे जगातील सर्वात जास्त श्रीमंत देश आहेत. या यादीत भारताचा समावेश नाही. GDP वर कॅपिटा रँकिंग 2023 नुसार, भारत सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत 129 व्या स्थानावर आहे. भारताचा जीडीपी दरडोई उत्पन्न 2673 (रु. 2.21 लाख) आहे. तर जागतिक जीडीपी क्रमवारीत भारत 5 व्या स्थानावर आहे. भारत हा एक असा देश आहे ज्याने जगभरात आपला प्रभाव निर्माण केला आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारत ही पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारताचे नाव येत नाही.

IMF च्या अंदाजानुसार, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणार आहे. 2014 मध्ये भारत या यादीत 10 व्या स्थानावर होता. दरडोई जीडीपीच्या बाबतीत भारताची स्थिती शेजारील बांगलादेश आणि श्रीलंकेपेक्षा वाईट आहे. 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी भारताला वार्षिक 8 टक्के दराने वाढ करावी लागेल. IMF चा अंदाज आहे की 2027 मध्ये भारतीयांचा सरासरी वार्षिक दरडोई GDP 3466 डॉलर असणार आहे. मात्र, यामुळं कॅपिटा रँकिंगमध्ये कोणतीही सुधारणा होणार नाही.

दक्षिण सुदान हा जगातील सर्वात गरीब देश

दक्षिण सुदान हा जगातील सर्वात गरीब देश मानला जातो. जिथे दरडोई जीडीपी 475 डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, जगातील दहा गरीब देशांमध्ये सरासरी दरडोई उत्पन्न 1432 डॉलर आहे, तर दहा श्रीमंत देशांमध्ये ते 105,170 डॉलरपेक्षा जास्त आहे.

जीडीपी म्हणजे काय ?

ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (Gross Domestic Product) म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादनं आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय. जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर तीन महिन्याला प्रदर्शित होते. देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा जीडीपी चा दर ठरविण्यासाठी विचार केला जातो.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts