अभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shweta Bachchan’s post : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबात काही स्थिर नाही अशा चर्चा सुरु आहेत. बच्चन कुटुंबात वाद असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, बच्चन कुटुंब हे अनेकदा काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यात वाद होतोय याच्या चर्चा पुन्हा सुरु होत आहेत. रिपोर्ट्नुसार, एकीकडे ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबातील लोकांसोबत मतभेद होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे तिची नणंद आणि अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चननं एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या क्रिप्टिक पोस्टनं सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. 

24 जानेवारी रोजी श्वेता बच्चननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती. त्यात तिनं असं एक पॉवरलफूल कोट शेअर केलं ज्यानं चर्चा सुरु झाली आहे. ‘शब्द हे कार्यक्रमासारखे आहेत, त्यामुळे अनेक गोष्टी घडतात, अनेक गोष्टी बदलतात. त्यामुळे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला बदलतात; त्यातून येणारी एक एनर्जी सगळं काही मिक्स करत असते कधी चांगलं तर कधी वाईट असते. त्यामुळे आपले इमोशन्स म्हणजेच भावना या सतत बदलत राहतात. कधी काय वाटतं तर कधी काय वाटतं’, असा काही श्वेतानं शेअर केलेल्या पोस्टचा अर्थ आहे.

vAfter abhishek Bachchan Shweta Bachchan Fuels Rumours Of Family Feud Drops A Cryptic Post

दरम्यान, या आधी अमिताभ बच्चन यांनी देखील एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी X अकाऊंट म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, त्यात त्यांनी काही क्लॅरिफाय केलं नव्हतं की ही पोस्ट नक्की कशा संबंधीत आहे. मात्र, त्यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी माफी मागितली होती. त्याशिवाय लवकर त्या सगळ्या जागा भरून काढणार असं म्हटलं होतं. 

हेही वाचा : अयोध्येवरून परतलेल्या आयुष्मान खुरानानं गायलं ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं?

‘कॉफी विथ करणच्या 6’ व्या सीजनमध्ये श्वेता बच्चननं खुलासा केला होता की ऐश्वर्याची कोणत्या गोष्टी तिला आवडतात, आवडत नाही आणि ती सहन करते. त्यावर बोलताना श्वेता म्हणाली होती की ऐश्वर्या तिच्या मेहनतीनं इथे पोहोचलीये, ती स्ट्रॉंग स्त्री आहे आणि एक चांगली आई आहे. तर मला तिचं टाईम मॅनेजमेंट आवडत नाही आणि हेच ती सहन करते.  

Related posts