[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Imam Umer Ilyasi : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेल्यानं इमाम उमर इल्यास याच्याविरोधात फतवा
अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष डॉ. उमर अहमद इल्यासी यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावरून त्यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला. डॉ. इल्यासी यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानात जाऊन राहा असा सल्ला दिला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी शांततेचा संदेश घेऊन गेलो होतो, राम मंदिर हे संपूर्ण देशाचं आहे, मी तिथं जाऊन कुठलीही चूक केलेली नाही, असं ते म्हणाले. मी अशा फतव्यांना घाबरत नाही, काही लोकांना आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
[ad_2]