Pune Crime News Update 4 police suspend loni kalbhor police station marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News Update : पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच अफरातफर केली आहे. रक्षकच असे करायला लागले तर कसं व्हायचं? अशी चर्चा परिसरात सुरु आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा टाकला. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी विकल्या. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे असे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माच्यांनी च काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली तसचं या गाड्या स्क्रॅप च्या असल्याचे सांगत पोलीस करणाऱ्याने या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.

स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. काल या 4 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts