Karnataka Free Bus Travel Scheme Cm Siddaramaiah Said Free Bus Serve For Women Allowed Up To 20 Km Inside Border States

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Karnataka Bus Travel Scheme for Ladies : आजपासून कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्या अंतर्गत महिला आजपासून सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, आज कर्नाटक सरकार शक्ती योजना लागू करणार आहे. त्यानंतर आजपासून महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

कर्नाटक सरकारचा महिलांना दिलासा

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने 11 जूनपासून राज्यात नवा नियम लागू केला आहे. या अंतर्गत महिलांना दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांच्या बस प्रवासासाठी विशेष योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना राज्या अंतर्गत 20 किमीपर्यंत प्रवास मोफत असेल. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महिलांना बस भाड्यात निम्मी सवलत आहे.

महिलांना 20 किमीपर्यंत मोफत बससेवा

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यासह पाच आश्वासने दिली होती. यानंतर सिद्धरामय्या यांचं सरकार येताच त्यांनी वचनपूर्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं होतं की, या योजनेअंतर्गत महिलांना राज्यांतर्गत फक्त 20 किमीपर्यंतच मोफत प्रवास करता येईल. महिलांसह तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

राज्यातील महिलांना शक्ती योजनेमुळे दिलासा

महागाईने त्रस्त झालेल्या राज्यातील महिलांना शक्ती योजनेमुळे दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं. महिलांना आंतरराज्यीय बसने प्रवास करायचा असेल तर ही सेवा मोफत नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एखाद्या महिलेला तिरुपतीला जायचे असेल तर ती मोफत प्रवास करू शकत नाही. 

कर्नाटकात मोफत बस प्रवासाचे नियम

सिद्धरामय्या सरकारने पाचपैकी एका हमीची पूर्तता केली आहे. एसी आणि व्होल्वो वगळता सर्व सरकारी बसमधून सर्व महिलांना राज्यात मोफत प्रवास करता येईल. यामध्ये एक्स्प्रेस बस सेवांचाही समावेश आहे. तिरुपतीला जाताना बससेवा मोफत नसेल. यासाठी तिरुपतीला जाताना महिला मुलबागल म्हणजे कोलार जिल्हा आंध्रप्रदेश सीमेपर्यंत मोफत प्रवास करु शकतात आणि त्यानंतर मात्र प्रवास मोफत होणार नाही.  शेजारच्या राज्यांतून 20 किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांनाही शुल्क माफ असेल.

महाराष्ट्र महिलांना बसभाड्यात 50 टक्के सवलत

महाराष्ट्रात एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत आहे. 17 मार्चपासून एसटी महामंडळाने हा नियम लागू केला होता. यानुसार, बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखलं जातं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts