Mayank Agarwal has filed a police complaint to investigate the matter after he drank poisonous liquid from a pouch in the flight

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आगरतळा : भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवालने फ्लाइटमध्ये आजारी पडल्यानंतर आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिल्लीमार्गे सुरतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात 32 वर्षीय मयंकने कट रचल्याचा आरोप करत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विमानात त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून त्याने पाणी समजून एक पेय प्यायले. ते प्यायल्यानंतर तो आजारी पडला. त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते. बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला सलामीवीर मयंक सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. कर्नाटकचे कर्णधार म्हणून त्याने त्रिपुराविरुद्धच्या दोन्ही डावात 51 आणि 17 धावा केल्या, त्यानंतर तो संघाच्या पुढील सामन्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. 

मयंकविरोधात काही षड्यंत्र आहे का?

मयंक 2 फेब्रुवारी रोजी सुरत येथे रेल्वे विरुद्ध संघाचा पुढील रणजी सामना खेळणार नाही. 32 वर्षीय मयंकने भारतासाठी 21 कसोटी खेळल्या आहेत. त्याने कर्नाटक संघाला सोमवारी त्रिपुराविरुद्ध 29 धावांनी विजय मिळवून दिला. पश्चिम त्रिपुराचे एसपी किरण कुमार म्हणाले, ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NCCPS (न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशन) येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.’ त्याने सीटवर ठेवलेले पेय प्यायल्यानंतर अचानक त्याच्या तोंडात जळजळ होऊ लागली. त्याला बोलताही येत नव्हते. त्याच्या तोंडाला सूज आणि व्रण होते. मात्र, प्रकृती स्थिर आहे.

अचानक उलट्या सुरु 

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) अधिकाऱ्याने या प्रकरणाची अधिक माहिती न देता सांगितले की, ‘त्याला (मयंक) कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तो सध्या आगरतळा येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली आहे आणि डॉक्टरांकडून अपडेट मिळाल्यानंतर आम्ही त्याला बंगळुरूला परत नेऊ. अफवांमध्ये तथ्य नाही. आता त्यांची प्रकृती स्थिर असून आम्ही राज्यातील डॉक्टर आणि इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.” निकिन जोस पुढील सामन्यात संघाचे कर्णधारपद भूषविण्याची अपेक्षा आहे कारण तो उपकर्णधारपदी नियुक्त झाला आहे.

त्या पेयात काही होतं का?

त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘संघ विमानात होता आणि मयंकला अस्वस्थ वाटू लागले आणि विमानात अनेक वेळा उलट्याही झाल्या. त्यानंतर तो विमानातून उतरला. केएससीएमधील एमआर शाहवीर तारापोर यांना फोन केला आणि आम्ही आमच्या दोन प्रतिनिधींना ताबडतोब आयएलएस रुग्णालयात पाठवले. आता त्याने काय प्यायले असावे याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत.’

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts