Rahul Gandhis car pelted with stonesduring Congress yatra in Bengal Adhir Ranjan Chowdhury

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवार दुपारी मालदा येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहचली, त्यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी खाली उतरले.  त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजनही उपस्थित होते. त्यांनी बंगाल सरकारवर आरोप केलाय. 

अधीर रंजन म्हणाले की, “ज्यावेळी राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली त्यावेळी आतमध्येच होतो. पाठीमागून कुणीतरी दगड फेकून मारल्याचं दिसले. पण पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींना येण्यापासून अडवलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये न्याय यात्रेनं प्रवेश केल्यापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. “

ही घटना म्हणजे कट – अधीर रंजन यांचा आरोप 

राहुल गांधी यांच्या ज्या गाडीवर हल्ला झाला, त्या गाडीमध्ये खासदार अधीर रंजनही होते.  गाडीची काच तोडण्यात आली. त्यावर अधीर रंजन म्हणाले की, “जितका विरोध व्हायचा तितका झालाय, याची सुरवात कूचबिहारपासून झाली. राज्यात विविध जिल्ह्यात सरकारी कामासाठी प्रशासकीय अधिकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिले आहेत. त्यामुळे तृणमूल सरकारने राहुल गांधींच्या न्याय यात्रेला गेस्ट हाऊस अथवा स्टेडियम उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलेय. “

भारत जोडो न्याय यात्रेला राज्य सरकारचा सपोर्ट नाही. मुर्शिदाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी ज्या स्टेडियमवर रात्री मुक्कामी थांबणार होते, त्याचीही परवानगी मिळाली नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनेवरुन कट रचला जातोय असे वाटतेय, असे अधीर रंजन म्हणाले.

आणखी वाचा :

Sangli News : राजकीय शापित सांगली! आर. आर. आबा, पतंगराव कदम ते अनिल बाबर; पदावर असतानाच घेतला जगाचा निरोप

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts