Sharad Mohol Case Pune Police Crime Branch Arrested main accused ganesh marne from Nashik

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Mohol Case :  गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात (Sharad Mohol Case) पुणे पोलिसांना (Pune Police) मोठे यश मिळाले आहे.  शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे (Ganesh Marne) याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) लावण्यात आला. 

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. 

शरद मोहोळ हत्या प्रकरणात 20 हून अधिकजणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 15 जानेवारी रोजी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. विठ्ठल शेलार,  रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती. 

शरद मोहोळ हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता

आतापर्यंत मुन्ना पोळेकर  हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने  इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट  रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी आज नाशिकमधून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणे याला अटक केली आहे. 

पुणे पोलिसांकडून आधीच 24 जणांना अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ  हत्येप्रकरणी जवळपास 24 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना बेड्या ठोकल्या आहेत.

लग्नाच्या वाढदिवशी आयुष्याची दोरी कापली

शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी  त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेलीय. शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले,  नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले.  सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या,  एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts