maratha reservation Manoj jarange on Union Budget 2024 jalana marathi news | Manoj jarange News : बजेटमध्ये आरक्षण देता आले तर पटकन द्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj jarange News : बजेटचं मला कळत नाही, ज्यांचं बजेट (Union Budget 2024) कोलमडलं ते मुंबईला (Mumbai) जाऊन काही मिळाले नाही म्हणत आहेत. बजेटमध्ये आरक्षण देता आले तर पटकन द्या, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे (Manoj jarange ) पाटील यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. मनोज जरांगे पाच महिन्यानंतर घरी परतले आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली, तसेच अंमलबजावणी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं. विसंगत स्टेटमेंट करू नये, जे करायचे ते दिलखुलास पणे करायचं, असा टोला मनोज जरांगे यांनी यावेळी लगावला. 

10 तारखेपासून आमरण उपोषण – 

15 फेब्रुवारीपासून राज्याचं अधिवेशन सुरु होणार आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी 10 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहे. काहींचं म्हणणे आहे मुंबईत जाऊन काय मिळाले, त्यांना सर्वाना मी विनंती करतो त्यांनी अंतरवलीला यावे. जे सोशल मीडियावर लिहीत आहेत त्यांनी येऊन सांगावे, काय मिळायला हव होतं, हे सांगावे, असे जरांगे म्हणाले. 

मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी हे सरकारने मान्य केलं आहे. अध्यादेश घेऊन आलोत, काही कसे मिळाले नाही. काहींना टोकरायची सवय आहे, गोरगरिबांच्या हाताला लागलं. ओबीसींचं न्यायालयात आव्हान देण्यात आलेय, त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांना मागे घ्या म्हणण्यात अर्थ नाही, त्यांना आवाहन काय करणार,ओबीसीचं 27 टक्के आरक्षण चॅलेंज करणार असे जरांगे म्हणाले. 

आम्ही ओबीसी – 

आमच्या ऐवजी दुसरा समाज असता तर मुंबईत धिंगाणा घातला असता, आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आलोत.  कायदा बनवावा लागनारच आहे. पाच पन्नास जण विरोधात बोलत आहेत, त्यांना बोलायची सवयच आहे. ओबीसीचे घरे आमचे ,ओबीसी आमच्यात गुलाल घेऊन नाचत आहेत. एक पत्र मिळाल्यावर बघ दिवाळी, आम्ही obc च्या दारात नाचत नाही आम्हीच ओबीसी आहोत, असे जरांगे म्हणाले. तू फक्त चष्म्याचे काच बदल, असा टोल छगन भुजबळ यांना लगावला. अर्धी मुंबई ठप्प झाली होती. आरक्षणाच्या नावाखाली भुजबळ यांना भावनिक वातावरण करायचे आहे, असा टोलाही लगावला. 

तब्बल 5 महिने 3 दिवसांनी मनोज जरांगे आज घराचा उंबरठा ओलांडणार 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेली 5 महिने सतत आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आज घरी परतणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टपासून तीन वेळा उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे आज आपल्या घराचा उंबरठा ओलांडत आत प्रवेश करतील. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल 5 महिने 3 दिवसांनंतर आज जरांगे आपल्या घरी परतणार आहेत.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts