50 वर्षांसाठी हवं तेवढं बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या मोदी सरकारच्या नव्या योजनेविषयी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण क्षेत्रात अर्थसंकल्पातून नवीन कोणत्या घोषणा होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं होतं. अशातच गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक मोठे बदल झाल्याचे अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याचेही निर्मला सीतारमन म्हणाल्या. यासोबत सीतारमन यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना

स्किल इंडिया मिशनअंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, 54 लाख तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यात आला. 3 हजार नवीन आयटीआयची स्थापना करण्यात आली. 7 आयआयटी, 16 आयआयआयटी, 7 आयआयएम, 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची स्थापना करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, देशात नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची सरकारची योजना आहे. यासंदर्भात लवकरच एक समिती स्थापन करण्यात येणार असून ती यासंदर्भातील समस्यांवर कार्यवाही करेल. अनेक विभागांतर्गत, सध्याच्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा वापर कसा करायचा हे देखील पाहिले जाईल.

युवा वर्गासाठी एक लाख कोटींचा निधी

निर्मला सीतारामन म्हणाल्या की अशा अनेक सुधारणांची गरज आहे ज्या वाढ आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील आणि विकसित भारताची दृष्टी मजबूत करू शकतील. अर्थसंकल्पात केवळ या वर्षात 50 वर्षांच्या कालावधीसाठी 1 लाख कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे.

सरकारने तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही निर्मला सीतारमन म्हणाल्या. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, सरकारने तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘देशातील तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल. 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेसाठी 1 लाख कोटींचं नियोजन करण्यात आलं आहे. यामुळे खाजगी क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. युवा शक्ती तंत्रज्ञानासाठी एक योजना तयार केली जाईल. स्किल इंडिया अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच 54 लाख तरुणांना कुशल बनवण्यात आले आहे, असे सीतारमन म्हणाल्या.

महिलांचा उच्च शिक्षणात वाढता सहभाग 

उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांमध्ये 10 वर्षांत महिलांचा सहभाग 28 टक्क्यांनी वाढला आहे. , सरकारच्या उपाययोजनांमुळे महिलांचा वाढता सहभाग दिसून येत आहे.  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग 43 टक्के आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

रोजगाराच्या संधी वाढल्या

युवकांना रोजगार क्षेत्रातही विविध योजनांचा आधार दिला. स्टार्ट-अप हमी योजना, फंड ऑफ फंड आणि स्टार्टअप इंडियामुळे तरुणांना रोजगार मिळवून देण्यात खूप मदत झाली. त्यांच्या मदतीने अनेक तरुण कामाला सुरुवात करू शकले, असेही सीतारमन म्हणाल्या.

Related posts