Ajit Pawar in Baramati : अजित पवारांचा बारामतीत 'भावनिक फवारा' सुरु! मी आजपर्यंत काही मागितलं नाही, पण आता…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
बारामती : मी आजपर्यंत काहीही मागितले नाही, मी फक्त तुम्हाला मतं मागतो. मी जो खासदारकीला उमेदवार देणार आहे त्याला मते मागणार असल्याचे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री यांनी त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा शरद पवारांवर तोफ डागताना कधी थांबणार माहीत नसल्याचा टोला लगावला.

इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका

स्वच्छता ठेवा, पचा पच थुकू नका, फुले तोडू नका, कॅनॉलमध्ये घाण टाकू नका. मला बारामतीला देशात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळवायचं आहे. आपल्या शब्दाला किंमत आली असून एका व्यावसायिकाने काम करायला एक कोटी दिले.  बारामतीतील काम करायला पक्षाचे पैसे घातले. एकीकडे अजित सांगतो आहे आणि एकीकडे वरिष्ठ सांगतो आहे कुणाचे ऐकायचे. इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका. उद्या आपल्या विचाराचा खासदार दिला तर मी मोदींना सांगेल की माझ्या लोकांनी खासदार दिला आहे आता माझी कामे झाले पाहिजेत. आपल्या अडीला कोण उपयोगी करतो याचा विचार करा.

मी उमेदवार आहे असे म्हणून मतदान करा

अजित पवार म्हणाले की, काहींना उपाध्यक्ष अध्यक्ष त्यांचं जोरात काम सुरू आहे. तिकडे गेलेले मला मुंबईत येऊन भेटले आणि माझी चूक झाली असे सांगितले. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुक असणार आहे,  अनेक प्रकारचे धाडसाने निर्णय घेतले. लवकरच मी महायुतीचा उमेदवार जाहीर करणार असून मी उमेदवार आहे असे म्हणून मतदान करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, शेवटची निवडणूक आहे असे सांगितले जाऊन भावनिक केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहित. एक जण आला आणि म्हणाला सुनेत्रा वाहिनीचे नाव घोषित करा, जर मला कौल दिला तर पुढील कामाला मी बांधील असेल.

कार्यकर्त्यांची कानउघडणी

अजित  पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांची सुद्धा कानउघडणी केली. अजूनही काही जण कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक नावे घेत नाहीत, पण तुमच्या गटा तटामुळे मला त्रास होतो. गट तट मला मान्य नाही. मी एकटा फिरेन, लोकं द्यायचे तेवढे मते देतील, असे म्हणत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला कानउघडणी केली. कामे करताना मला वाईटपणा घ्यावा लागतो, उंबराचे झाड आले की काही जण दत्त जयंती करतात. पण पक्षाने फळ खाल्ले की त्याच्या विष्ठेतून नवीन झाड येते. सगळ्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. परवा गंगावेसला गेलो तिथेही मला काम करायचं आहे.

इतर महत्वाच्य बातम्या

Ajit Pawar : साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती, पण अमित शाहांनी लक्ष घालून दूर केली; अजित पवारांची प्रतिक्रिया

[ad_2]

Related posts