is Police Sub Inspector scapegoat in Lalit Kala Kendra case What is actual case and what has happened so far pune Savitribai Phule Pune University marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lalit Kala Kendra News Update : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्र (Lalit Kala Kendra) झालेल्या तोडफोड प्रकरणी पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांना बळीचा बकरा बनवून त्यांचं निलंबन करण्यात आलंय. कारण तोडफोड होताना वरिष्ठांच्या आदेशावरून बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल्स बाजूला केल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणंय. तर दुसरीकडे विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीत सिने अभिनेते प्रवीण तरडे आणि भाजपचे राज्य प्रवक्ते विनायक आंबेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून वादग्रस्त नाटकाशी संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी होत असताना दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्ध विद्यापीठातील प्राध्यापक संघटना आक्रमक झाल्यात. 

विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात ‘जब वुई मेट’ या वादग्रस्त नाटकाच्या सादरीकरणांनंतर शनिवार सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह नाटकाशी संबंधित पाच विद्यर्थ्यांना अटक करून ललित कला केंद्राला कुलूप लावण्यात आलं होतं. 

पोलीस उपनिरीक्षक बळीचा बकरा?

दरम्यान, संध्याकाळी पाच वाजता अचानक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल्सना बाजूला करण्यात आलं आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ललित कला केंद्रात तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीचं खापर बंदोबस्तासाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच्यावर फोडण्यात आलं आणि त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांना बळीचा बकरा बनवलं जात असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. 

एका महिन्यात चौकशी समितीचा अहवाल सादर होणार

दुसरीकडे विद्यापीठाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळकृष्ण पानसे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीत सिने अभिनेते आणि दिगदर्शक प्रवीण तरडे यांच्यासह विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य असलेले भाजपचे राज्य प्रवक्ते विनायक आंबेकर यांचा समावेश आहे. एक महिन्यात चौकशी समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, त्या आधीच  प्रवीण भोळे यांच्यासह नाटकाशी संबंधित व्यक्तींचं निलंबन व्हावं, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.  

विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटना आक्रमक

पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि प्राध्यापक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. प्राध्यपकांनी विद्यापीठ प्रशासनाने डॉकटर प्रवीण भोळे यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं म्हटलं आहे. 

विद्यापीठातील वातावरण गढूळ बनतंय

शुक्रवारी संध्यकाळी ललित कला केंद्राच्या अँफी थिएटरमध्ये सादर झालेल्या या वादग्रस्त नाटकावरून सुरु झालेलं नाट्य अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीय. मात्र, यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वातावरण गढूळ बनतंय, याचं भान दोन्ही बाजूंकडे ठेवण्याची गरज आहे . 

या वादग्रस्त नाटकाच्या सादरीकरणानंतर सुरु असलेले निषेधाचे, समर्थनाचे आणि कारवाईचे  प्रकार देखील तेवढेच नाट्यमय आणि वादग्रस्त आहेत. हा वाद विद्यापीठातून केव्हाच बाहेर पडून इतरत्र पोहचलाय याचं भान या वादग्रस्त नाट्यात असहभागी असलेल्या पात्रांना नक्कीच आहे. किंबहुना त्यातूनच आपलं इप्सित साध्य होत असल्याचं लक्षात आल्यानं हा वाद शमवण्याऐवजी तो अधिक कसा धुमसत राहील यासाठी प्रयत्न होतायत. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts