Pimpri Chinchwad Crime News humiliating behavior from boyfriend mba student end life in hostel

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pimpri Chinchwad Crime News : प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं. पिंपरी चिचंवडमध्ये एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीने हॉस्टेलमध्येच गळफास घेत आयुष्याचा दोर तोडला. हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयाच्या मुलींच्या डेल्टा हॉस्टेलमध्ये 3  ऑक्टोबर 2023 रोजी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसांनी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri Chinchwad Crime News)

गुडीया कुमारी (वय-25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर अश्वनी भारद्वाज (रा. रंजित सिंह, डुमरी, लखीसराय, बिहार) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुडीया कुमारी ही  हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयात एमबीएचं शिक्षण घेत होती. मागील दोन ते तीन वर्षांपासून तिचं अश्वनी याच्यासोबत अफेअर होतं. पण त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. अश्वनी तिला सातत्याने अपमानास्पद वागणूक देत होता. त्याशिवाय त्याचं दुसऱ्या एका मुलीसोबतही अफेअर जुळलं होतं. गुडीया कुमारी हिने टोकाचं पाऊल उचललं. याबाबत मयत मुलीचे वडिल भोलासिंग परमात्मा प्रसाद सिंग (वय-48 रा. मसत्थुता-बाड, जि. पटना बिहार) यांनी रविवारी (दि.4) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्य़ाद दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 

प्रियकराचं डबल डेटिंग,  अपमानास्पद वागणूक – 

मृत तरुणीच्या वडिलांनी चार फेब्रुवारी रोजी अश्वनी याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी गुडीया कुमारी हिचे महाविद्यालाती शिकणारा अश्विनी याच्यासोबत अफेअर होते. मागील तीन ते चार वर्षांपासून ते डेटिंग करत होते. पण गेल्या काही दिवसांपासून अश्विनी याचं दुसऱ्या मुलीसोबत सूत जुळालं. तो त्या मुलीसोबत फिरत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद वाढले. त्यातच अश्वनी याच्याकडून गुडीया कुमारी हिला अपमानास्पद वागणूक मिळात होती. तो तिचा अपमान करायचा. मरुन जा. मला काही फरक पडत नाही… असे वारंवार म्हणायचा. तसेच मुलीच्या मित्रांसमोर मारहाण करुन तिला अपमानित करत होता.

नैरश्यातून आत्महत्या – 

तू मरुन जा, मला काही फरक पडत नाही असे म्हणत तिला मानसिक त्रास देत होता. अश्वनी याच्याकडून सतत मानसिक त्रास होत असल्याने फिर्य़ादी यांची मुलीला नैराश्य आले. अश्वनी याने गुडीया कुमारी हिला वारंवार आत्महत्यास प्रवृत्त केले. त्यातूनच मुलीने हॉस्टेलमधील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम शेळके तपास करत आहेत.  

आणखी वाचा :

पतीच्या निधनानंतर चुलत सासऱ्यावर जडला जीव, चार मुलांच्या आईचा लग्नाचा हट्ट, पोलीस ठाण्यातच हायवोल्टेज ड्रामा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts