Tata Technologies Ipo Listing Today On 30 November Gmp Shows Bumper Listing Could Be At 85 Percent Premium BSE NSE Know More Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tata Technologies IPO Listing: टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technologies) आयपीओ (IPO) मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स (Tata Technologies Shares) आज लिस्ट होणार आहेत. जवळपास 20 वर्षांनंतर आलेल्या टाटा समूहाच्या (TATA Group) IPO मध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. बीएसईच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, टाटा टेकचा आयपीओ 30 नोव्हेंबरला म्हणजेच, आजच्या लिस्टसह शेअर बाजारात पदार्पण करेल. हा आयपीओ बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) दोन्हीवर लिस्ट केला जाईल.

जबरदस्त लिस्टिंग होण्याची चिन्ह

Tata Tech चा  3,042.51 कोटी रुपयांचा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे लॉन्च करण्यात आला आहे. या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि 64.43 वेळा सबस्क्राइब झाल्यानंतर हा इश्यू बंद झाला होता. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच, GMP मध्ये टाटा टेकचे शेअर्सही जोमात आहेत. 30 नोव्हेंबर रोजी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओ शेअर्सचा जीएमपी 425 रुपये प्रति शेअर राहिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 500 रुपये ठेवण्यात आली होती. याचाच अर्थ, जर तुम्हाला 500 रुपयांच्या शेअरच्या किमतींवर 425 रुपयांचा GMP मिळत असेल, तर हा स्टॉक 85 टक्क्यांच्या बंपर प्रीमियमवर लिस्टिंग दाखवू शकतो.

जर GMP नुसार लिस्टिंग झाली, तर आज टाटा टेक शेअर्स 85 टक्के बंपर प्रीमियमसह 925 रुपये प्रति शेअरमध्ये लिस्ट केले जाऊ शकतात. तसेच, काही तज्ज्ञांचं असं मत आहे की, लिस्टिंगच्या दिवशीच शेअर्स 1000 रुपयांची पातळी गाठू शकतात.

गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद 

Tata Technologies च्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी खूप रस दाखवला होता आणि कंपनीच्या 4,50,29,207 शेअर्सच्या तुलनेत 3,12,63,97,350 शेअर्ससाठी बोली लागली होती. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांचा हिस्सा 16.50 पट, क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्सनी 203.41 पट आणि नॉन-इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्सनी 62.11 पटीनं सब्सक्राइब केलं आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांचे शेअर्स 3.70 पट आणि शेअर होल्डर्सचे 29.19 पट सबस्क्राइब झाले आहेत. हा IPO 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीनं त्याची किंमत 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली होती.

IPO ला ऑफरच्या 69.43 पट लागली बोली

शेवटच्या दिवशी टाटा टेकचा आयपीओ एकूण 64.43 पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या कोट्याच्या 16.50 पट सदस्यता घेतली होती. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हा IPO 203.41 वेळा सबस्क्राइब केला आहे आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 62.11 वेळा सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा कोटा 3.70 वेळा आणि शेअरहोल्डर्सनी 29.19 वेळा सबस्क्रिप्शन घेतलं आहे. या IPO मध्ये, टाटाला 4,50,29,207 शेअर्सऐवजी 3,12,63,97,350 शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. ही ऑफर केलेल्या बोलीच्या 69.43 पट आहे.

[ad_2]

Related posts