maharashtra political crises ncp mla rohit pawar on ncp crises marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Pawar : महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच (Ajit Pawar) आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला (Sharad Pawar) स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “असंवैधानिक पद्धतीने फुटीरगटाला पार्टी आणि घड्याळाचं चिन्ह दिलं असलं तरी ज्या बापाने ती पार्टी सुरु केली असा बापमाणूस आमच्या बरोबर आहे.” असं रोहित पवार यांनी म्हटलंय. 

या संदर्भात बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले, भाजपाची एक राजकीय विंग झालीय असं म्हणावं लागेल कारण तिथला जो प्रमुख आहे त्याची नियुक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार हा सत्तेतल्या लोकांना आहे. त्यामुळे अशा निवडणूक आयोगाकडून आपण दुसरं काय अपेक्षित करणार होतो? असंवैधानिक पद्धतीने फुटीरगटाला पार्टी आणि हे चिन्ह दिलं असलं तरी ज्या बापाने ती पार्टी सुरु केली असा बापमाणूस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे आम्हाला कसलंच टेन्शन वाटत नाही.” असं पवार म्हणाले. तर,  फुटीरगट असेल किंवा भाजपा महाराष्ट्र असेल त्यांच्याकडे कुटुंब आणि पक्ष फोडण्याची एवढी ताकद असेल, निवडणूक आयोगाकडून निर्णय आपल्या बाजूने करून घेण्याची ताकद असेल तर मग मराठा समाज, लिंगायत समाज, धनगर समाज आणि मुस्लिम समाज या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50 टक्क्यांच्या पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? असे वक्तव्य करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. 

राज्य सरकारवर साधला निशाणा

राज्य सरकारवर टीका करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ‘जे प्रकल्प गुजरातला चाललेत, त्यामुळे बेरोजगार युवकांना अडचण येतेय ते थांबविण्याची धमक या सरकारकडे नाही का? शेतकऱ्याला न्याय देण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का?  भाजपाची केंद्रातली जी महाशक्ती आहे त्याचा वापर तुम्ही फक्त स्वहितासाठी आणि स्वार्थासाठी करून घेण्यासाठी करता पण, महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी करत नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे अशा शब्दांत खंत व्यक्त केली आहे. पण, आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आम्ही कोर्टात जाऊ आणि लढू. 

शेवटी 2000 साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं. तेव्हा कुणालाही आमचं चिन्ह माहीत नव्हतं. सगळ्यांना पवार साहेब कोण आहेत, पवार साहेबांनी काय केलंय हे माहीत होतं. ज्यामुळेच हे फुटीरगटातले नेते निवडून आले. त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे असं रोहित पवार म्हणाले. 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts