India news CM nitish kumar visit to delhi meeting with pm narendra modi discussion on seat sharing in nda marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nitish Kumar : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी भाजपबरोबर (BJP) एनडीएमध्ये (NDA) प्रवेश केला. आता नितीशकुमारांना एनडीएमध्ये 17 जागा मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जेडीयू इंडियाने युतीकडे 17 जागांची मागणी केली होती. पण, या संदर्भात काही घडत नव्हते. याच दरम्यान, नितीशकुमार यांनी आपली बाजू बदलली. पण, एनडीएमध्ये काही ठिक नाहीये. नितीश कुमार आज (7 फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, त्याआधीच खळबळ उडाली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज  दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. तसेच, ते भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिंह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक घेतली होती. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीतही जागांबाबत अडचण निर्माण होणार आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

2019 मध्ये भाजप-जेडीयू प्रत्येकी 17 जागांवर लढले होते

2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू-भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष एकत्र लढले होते. भाजपने 17 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि जेडीयूने 17 जागांवर उमेदवार उभे केले होते. एलजेपीने 6 जागांवर निवडणूक लढवली होती. यामध्ये जेडीयूला एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागला तर भाजपने 17 जागांवर विजय मिळवला. एलजेपीलाही 6 जागांवर विजय मिळवला होता.  

आता 2024 च्या निवडणुकीत समीकरणे बदलताना दिसतायत. कारण यावेळी जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचाही एनडीएमध्ये समावेश आहे. यावेळी लोक जनशक्ती पक्षही पशुपती पारस आणि चिराग पासवान अशा दोन भागांत विभागला गेला आहे. अशा स्थितीत 2019 प्रमाणे भाजप 17 जागांवर आणि JDU 17 जागांवर निवडणूक लढवणार असेल तर 6 जागांची विभागणी कशी होणार? चिराग, पशुपती पारस, मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांना किती मिळणार? यापूर्वीच 6 जागांची मागणी करणारे चिराग पासवान सहमत होतील का? असे अनेक प्रश्न असून एनडीएमध्ये अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये जेडीयूला कमी जागा देण्यासाठी संघानेही हस्तक्षेप केला आहे. बिहारमध्ये जेडीयूला 11 ते 12 जागा दिल्या जाऊ शकतात, असे संघाने स्पष्टपणे सांगितले आहे. तर, दुसरीकडे चिराग पासवानही हार मानायला तयार नाहीत.  

महत्त्वाच्या बातम्या :

Weather Update : उत्तर भारतात थंडीपासून दिलासा! पुढच्या आठवड्यात ‘या’ भागांत पुन्हा पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts