Pune Crime news Sharad Mohol Case 10 thousand audio clips pune police arrest ar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रत्येक  (Sharad Mohol Case)आरोपीला फिल्मी स्टाईलने प़कडण्यात पुणे पोलीस यशस्वी होताना दिसत आहे. गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला  (Sharad Mohol Case) पुणे पोलिसांनी पाठलाग करत गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्या आणि आता याच प्रकरणातील आरोपी  अभिजीत वरुण मानकर (Abhijit Varun Mankar) याला पोलिसांनी सापळा रचून गजाआड केलं आहे. अभिजीत मानकर हा 31  वर्षाचा आहे. ऑडिओ क्लिपमार्फत पुणे पोलीस अभिजित मानकरपर्यंत पोहचले अन् थेट बेड्या ठोकल्या. 

अभिजीत मानकरला पोलिसांनी कसं पडकलं?

शरद मोहोळ प्रकरणाच्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचण्याचा चंग पुणे पोलिसांनी बांधला आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहे. त्यातच आतापर्यंत  16 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. प्रत्येक आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांचा खास प्लॅन दिसत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 18 हजार ऑडिओ क्लिप तपासल्या आहेत. शरद मोहोळ आणि आरोपींचे मोबाईलमधून या सर्व क्लिप सापडल्या. यातील 10, 500 ऑडिओ क्लिप तपासल्या आणि त्यानंतर सहा ऑडियो क्लिप संशयास्पद आढळल्या. या सगळ्याचा सुगावा घेत आणि एक एक बारीक चौकशी करत आणि एका क्लिपचे दुसऱ्या क्लिपशी संबंध जोडले. तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले. हे ऐकून पोलिसांनी अभिजित अरुण मानकरला बेड्या ठोकण्याचा चंग बांधला आणि पुणे पोलिसांनी सापळा रचून गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक केली. 

पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्येप्रकरणी याआधी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि आता अभिजित मानकरला अटक केली आहे.

गणेश मारणे आणि विठ्ठल शेलारकडून जीवाला धोका; स्वाती मोहोळांची पोलिसांना माहिती

शरद मोहोळ  हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार केलाय. शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान आता अजून एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा स्वाती मोहोळने केला.

इतर महत्वाची बातमी-

Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts