Woman Stripped And Raped In Manipur Says Police Were With The Mob They Left Us With Those Men Manipur Women Viral Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manipur Violence : मणिपूरमधील घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली तेव्हा पोलीसही तेथे उपस्थित होते, ही बाब आता उघडकीस आली आहे. विवस्त्र करून धिंड आणि लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलिसांनीच आम्हाला त्या नराधमांच्या ताब्यात दिल्याचं म्हटलं आहे. यामुळे आणखीनच खळबळ माजली आहे.

‘पोलिसांनी आम्हाला त्यांच्या ताब्यात दिलं’

मणिपूरमध्ये विवस्त्र करून धिंड आणि लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेनं सांगितलं आहे की, निर्वस्त्र धिंड काढण्यात आली तेव्हा पोलीस जमावासोबत होते. त्यांनीच आम्हाला त्या पुरुषांसोबत सोडले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दोन पीडितांपैकी एका महिलेने घडलेला प्रकार सांगितला आहे. या रिपोर्टनुसार, पीडित महिलेने सांगितलं की, ”आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत पोलीसही होते. पोलिसांनी आम्हाला घराजवळून उचललं आणि गावापासून थोडे दूर नेले आणि जमावासोबत रस्त्यावर सोडलं. आम्हाला पोलिसांनी त्या नराधमाच्या ताब्यात दिलं.”

विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेची प्रतिक्रिया

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा आणि त्यांच्या लैंगिक अत्याचार झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. पीडितांपैकी एकाने इंडियन एक्सप्रेसला माहिती सांगितलं की, त्यांना पोलिसांनी जमावाकडे सोडलं.

विवस्त्र धिंड, सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

मणिपूरमध्ये दोन महिलांचा विवस्त्र धिंड काढण्यात आली यापैकी एक महिलेचं वय सुमारे 20 आणि दुसऱ्या महिलेचं वय 40 आहे. पुरुषांच्या जमावाने या महिलांना निर्वस्त्र करुन रस्त्यावर चालण्यास भाग पाडलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही पुरुष दोन महिलांना विवस्त्र करून शेताकडे ओढून जबरदस्तीने खेचताना दिसत आहेत. 18 मे रोजी दाखल करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीत, पीडित महिलांनी क्रूरपणे विवस्त्र धिंड काढून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले पोलीस?

मणिपूर पोलिसांचे एसपी के मेघचंद्र सिंह (K Meghachandra Singh) यांनी एक निवेदन जारी करून सांगितलं आहे की, महिलांना विवस्त्र करण्याची ही घटना 4 मे रोजी घडली आहे. यामध्ये आम्ही नॉनगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार, हत्या आणि अपहरण या कलमांसह इतर कलमांमध्ये दोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts