Indian Fintech industry poised for expansion 1.66 lakh crore industry by 2030

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fintech Industry : भारतीय फिनटेक उद्योग (India Fintech Industry) विस्तारासाठी सज्ज आहे. 2030 पर्यंत फिनटेक उद्योग जवळपास 20 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1.66 लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. एक नवीन रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती सांगितली आहे. द डिजिटल फिफ्थच्या सहकार्याने Chiratae Ventures ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, येत्या दशकात वित्तीय क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानातील गुंतवणुकीत उच्च वाढ होण्याची अपेक्षा आहे.

द डिजिटल फिफ्थ चिराटे व्हेंचर्सद्वारे एक अहवाल जारी केला आहे. येणाऱ्या दशकात वित्तीय तंत्रज्ञानामध्ये उच्च वाढ होण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत एंटरप्राइझ फिनटेक उद्योगात 20 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असल्याची माहिती Chirate Ventures चे संस्थापक चेअरमन सुधीर सेठी यांनी दिली. रिटेल आणि एमएसएमई क्षेत्रांसाठी बँका आणि NBFC पुढील 10 वर्षांत पूर्णपणे डिजिटल होतील असेही ते म्हणाले. 

भारत बनतेय कॅशलेस अर्थव्यवस्था

भारत देशात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं झपाट्यानं बदल होत आहेत. भारत कॅशलेस अर्थव्यवस्था बनत आहे. भारत हा जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकाचा जीवन विमा बाजार असलेला देश आहे. हा बाजार 2027 पर्यंत ते 200 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

FinTech म्हणजे काय?

वित्तीय तंत्रज्ञानाचे संक्षिप्त रुप म्हणजे  FinTech. आर्थिक बाजारपेठांमध्ये आर्थिक उत्पादन किंवा सेवा प्रदान करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणून FinTech परिभाषित केले आहे. खऱ्या अर्थाने फिनटेक होण्यासाठी, एखाद्या विशिष्ट बाजारपेठेमध्ये जे मानक मानले जाते त्यापेक्षा तंत्रज्ञान अधिक अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. ज्या आर्थिक पद्धती पहिल्यांदा उदयास आल्या तेव्हा अभूतपूर्व होत्या. जसे की एटीएम, क्रेडिट कार्ड त्यांना फिनटेक मानले जात नाही कारण ते प्रस्थापित तंत्रज्ञान बनले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Tata-Airbus Deal : आता टाटा बनवणार हेलिकॉप्टर, फ्रान्सच्या एअरबस कंपनीसोबत करार; ‘मेड इन इंडिया’ला चालना

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts