PM Narendra Modi read Pandit Nehru letter in Rajya Sabha Pandit Nehru had said I dont like any reservation marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi In Rajya Sabha Live : एकीकडे राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) आपल्या भाषणातून आरक्षणाच्या मुद्यावरून म्हत्वाच वक्तव्य केले आहे. मोदींनी राज्यसभेत पंडीत नेहरूंनी (Pandit Nehru)  मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्राचा उल्लेख करत, ‘मला कोणतेही आरक्षण आवडत नाही’ अशी भूमिका नेहरूंची होती असा दावा केला. यावेळी त्यांनी राज्यसभेत नेहरूंचे ते पत्र देखील वाचून दाखवले. 

आपल्या भाषणात बोलतांना मोदी म्हणाले की, ‘नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, मला कोणतेही आरक्षण आवडत नाही, खास करून नोकरीमधील आरक्षण… अकार्यक्षमतेला चालना देणाऱ्या अशा कोणत्याही गोष्टीच्या मी विरोधात आहे. पंडित नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र आहे. त्यामुळे मुळात काँग्रेसचाच एससी-एसटी आरक्षणाला विरोध असल्याचे मी म्हणतो, असे मोदी म्हणाले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर एसटी आणि एससीला आरक्षण मिळाले असते की नाही याबाबत शंका असल्याचे देखील मोदी म्हणाले. 

काँग्रेसचा आदिवासी महिलेला विरोध…

भाजपच्या मदतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडक यांना भारतरत्न मिळाला. काँग्रेसने सीताराम केसरींचे काय केले? ते देशाने पाहिले आहे. देशात पहिल्यांदाच एका पक्षाने आदिवासी समाजाच्या मुलीला राष्ट्रपती केले. काँग्रेसचा विरोध वैचारिक नव्हता, त्यांचा विरोध आदिवासी महिलेच्या विरोधात होता, अशी टीका मोदी यांनी केली. 

आम्ही झोपडपट्टीवासीयांसाठी काम केले.

एनडीएमध्ये आम्ही सर्वात आधी दलितांसाठी आणि त्यानंतर आदिवासींसाठी काम केले. हे लाभार्थी कोण आहेत आणि ते कोणत्या समाजाचे आहेत?, आम्ही जे काही काम केले ते एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील लोकांसाठी केले आहे. आम्ही झोपडपट्टी वासीयांसाठी काम केले. 

मुख्यमंत्री केंद्रातील मंत्री मला भेटायला घाबरायाचे 

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी केंद्रातील मंत्री मला भेटायला घाबरत होते. माझ्यासोबत त्याचा फोटो काढला जाऊ नयेत यासाठी काळजी घेत होते, असे मोदी म्हणाले. याचवेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.  गुजरातमध्ये एकदा नैसर्गिक आपत्ती आली होती. यावेळी एका मंत्र्याने गुजरातचा दौरा केला. मात्र, या नेत्याने हेलिकॉप्टरने राज्याचा दौरा केला होता. गुजरातमध्ये उतरण्याची तसदीही या मंत्र्याने घेतली नसल्याचे मोदी म्हणाले. 

आंबेडकरांच्या योगदानाची अवहेलना करण्याचा प्रयत्न  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांचे नाव न घेता निशाणा साधला. मोदी म्हणाले की, काँग्रेसचा एक नेता अमेरिकेत बसला आहे. जो काँग्रेस परिवाराच्या अगदी जवळचा आहे. संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची अवहेलना करण्याचा त्याने  आटोकाट प्रयत्न केला असल्याचा आरोप मोदींनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

ऊर्जा क्षेत्रात भारत बनणार किंग, पंतप्रधान मोदींनी केली मास्टर प्लॅनवर चर्चा 

अधिक पाहा..

Related posts