[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Fixed Deposit Rates : तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरी कुणी ज्येष्ठ नागरिक असेल आणि गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर FD योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. आम्ही तुम्हाला अशा टॉप-5 बँकांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवू शकता.
1. HDFC बँकेचा व्याजदर
HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना एक वर्ष ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.10 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक 15 ते 18 महिन्यांच्या FD योजनेवर 7.60 टक्के आणि 18 महिने ते 2 वर्षे आणि 11 महिन्यांच्या FD योजनेवर 7.50 टक्के व्याजदर देत आहे.
2. ICICI बँकेचा व्याजदर
ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या FD योजनेवर 7.25 टक्के आणि 15 महिने ते 2 वर्षांच्या FD योजनेवर 7.05 टक्के व्याजदर देत आहे.
3. SBI बँकेचा व्याजदर
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 7.30 टक्के व्याजदराने 1 वर्ष ते 2 वर्षांची FD योजना देत आहे. बँक 2 ते 3 वर्षांची FD योजना 7.5 टक्के व्याजाने देत आहे. बँक अमृत कलश योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या एफडी योजनेवर 7.60 टक्के व्याजदर देत आहे.
4. बँक ऑफ बडोदाचा व्याजदर
बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना 1 ते 2 वर्षांच्या FD योजनेवर 7.35 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक 2 ते 3 वर्षांच्या FD योजनेवर 7.75 टक्के व्याज दर देत आहे.
5. कोटक महिंद्रा बँक व्याजदर
खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँक 390 दिवसांच्या FD योजनेवर 7.65 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक 23 महिन्यांसाठी FD योजनेवर 7.80 टक्के व्याज दर देत आहे.
SBI ने WeCare वरील गुंतवणुकीची मुदत वाढवली
भारतीय स्टेट बँकेच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या खास FD योजनेचा, WeCare मधील गुंतवणुकीची मुदत वाढवली आहे. SBI WeCare FD स्कीममधील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काल मर्यादेदरम्यान, एफडी गुंतवणूक केली जाऊ शकते. एफडीचे नूतनीकरण देखील केले जाऊ शकते. यामुळं गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याज मिळविण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. ही FD योजना ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर देते.
SBI Wecare FD वर किती व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या विशेष एफडी स्कीम SBI WeCare वर सर्वाधिक 7.50 टक्के व्याजदर देत आहे. SBI WeCare FD मध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करु शकतात. मग तो शेतकरी असो किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला व्यक्ती असो.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
[ad_2]