[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Lok Sabha Election 2024 : दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून (UP Lok Sabha Election) जातो असं नेहमी म्हटलं जातं. त्याच कारण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्याचपार्श्वभूमीवर इंडिया टुडे ग्रुपनं सर्व्हेक्षण केलेय. इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी देशातील 543 लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) सर्वोक्षण केलेय. लोकसभा निवडणुकीआधी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपला फायदा झाल्याचे दिसतेय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा 2.13 टक्के मतं जास्त मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सर्व्हेनुसार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपला 80 पैकी 70 जागांवर यश मिळेल. भाजपला उत्तरप्रदेशमध्ये यंदा 52.1 टक्के मते मिळतील. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या 8 जागा वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि सपा यांना उत्तर प्रदेशमध्ये 35 टक्केंपेक्षा कमी मते मिळू शकतात. तर बसपाला स्वबळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मतांची टक्केवारीही घटण्याची शक्यता आहे.

कधी झाला सर्व्हे -

मागील दीड महिन्यात (15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024) हा सर्व्हे केला आहे. 35 हजार लोकांसोबत चर्चा केली तर वेगवेगळ्या पद्धतीने दीड लाख लोकांसोबत सर्व्हे केलाय. जर आज देशात लोकसभा निवडणूक झाली तर कुणाला किती जागा मिळतील ? असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला. भाजपवा 370 जागा मिळतील का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का ? जनतेमध्ये सर्वात लोकप्रिय कोण आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व्हेच्या माध्यमातून केला.

भाजपला 52.10 टक्के मतं -

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यंदा तगडा फायदा मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 52.1 टक्के मते मिळू शकतात. 2019 च्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढणार आहे. 2019 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 49.97 टक्के मतं मिळाली होती.

भाजपला 70 जागा

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा दबदबा दिसतोय. भाजपला 80 पैकी 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपना दल पक्षाला दोन जागा मिळू शकतात. म्हणजेच, 80 पैकी एनडीएला 72 जागा मिळू शकतात. समाजवादी पार्टी पक्षाला सात जागा मिळतील. काँग्रेसला फक्त एका जागेवार समाधान मानावे लागेल. गतवेळच्या तुलनेत सपाला दोन जागाचा फायदा होईल. यावेळच्या निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळणार नसल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झालेय.

काँग्रेसच्या मतांमध्ये घट -

2019 च्या तुलतेन उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरल्याचे दिसतेय. काँग्रेसला एक टक्केही मते मिळण्याची शक्यता नाही. 2019 मध्ये काँग्रेसला 6.36 टक्के मते मिळाली होती.

सपाच्या मतांमध्ये वाढ -

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी पक्षाच्या मतांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सपाला या लोकसभा निवडणुकीत 30.10 टक्के मते मिळू शकतात. सपाला 11.99 टक्के मतांचा फायदा होईल. 2019 मध्ये सपाला 18.11 टक्के मते मिळाली होती. दुसरीकडे बसपाच्या मतांमध्ये घट झाल्याचे दिसतेय. बसपाला यंदा 8.4 टक्के मते मिळतील. 2019 मध्ये त्यांना 19.4 टक्के मते मिळाली होती.

आणखी वाचा :

MNS Vasant More : "आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत’; स्टेटसमुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत; मनसेत इच्छुकांची गर्दी वाढली?

[ad_2]