rbi mpc Shaktikanta Das on paytm crisis reserve bank of india faq on upi online digital transaction marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: पेटीएमने केलेल्या नियमांच्या उल्लंघनानंतरही (Paytm Payments Bank) त्यांना पुरेसा वेळ दिला गेला आणि मगच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली. आर्थिक क्षेत्रातील प्रत्येक कंपनीसाठी काही नियम आहेत, त्यांनी त्याचे पालन करणं अत्यावश्यक आहे, जर काही उल्लंघन झालं तरीही रिझर्व्ह बँक त्या संस्थेला पुरेसा वेळे देते असंही त्यांनी स्पष्ट केलं. पेटीएमसंबंधी ग्राहकांना पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रश्नोत्तरे म्हणजे FAQ  जारी केले जाणार आहेत. 

तीन दिवसीय पतधोरण समिती बैठकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी पेटीएम विरुद्ध नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी फिनटेक क्षेत्रातील चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. पेटीएम विरोधात केलेल्या कारवाईमुळे फिनटेकला घाबरण्याची गरज नाही, कारण ही कारवाई एका घटकाशी संबंधित आहे. बँकिंग नियामकाकडून प्रत्येकाला पुरेसा वेळ दिला जातो असं शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं.

पेटीएम क्रायसिसवर FAQ येतील

पेटीएम क्रायसिसबाबत विचारले जाणारे प्रश्न पाहता, गव्हर्नर दास म्हणाले की रिझर्व्ह बँक लवकरच या संदर्भात FAQ जारी करेल. ते म्हणाले की, सर्व नियमन केलेल्या संस्थांना रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा त्याचे पालन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. पेटीएम पेमेंट्स बँक देखील नियमन केलेल्या संस्थांमध्ये समाविष्ट आहे आणि या पेमेंट्स बँकेला देखील अनुपालनासाठी सेंट्रल बँकेने पुरेसा वेळ दिला होता.

रिझर्व्ह बँकेची भीती बाळगू नका

पुरेसा वेळ देऊनही नियमांची पूर्तता होत नाही, तेव्हा रिझर्व्ह बँकेकडून कारवाई केली जाते असं शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं. जर एखाद्या संस्थेने नियमांचे पालन केले तर आम्हाला कारवाई करण्याची काय गरज आहे? आम्ही एक जबाबदार नियामक आहोत, त्यामुळे नियम पाळणाऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असं शक्तीकांत दास म्हणाले. 

कोणत्याही विशिष्ट प्रकरणाबाबत किंवा घटकाबाबत फार काही सांगण्याची गरज नाही. त्याचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सात मुद्द्यांमध्ये परिस्थिती स्पष्ट केली. 

RBI गव्हर्नरचे सात मुद्दे

1. रिझर्व्ह बँक आर्थिक क्षेत्रातील इनोव्हेशनला पाठिंबा देते आणि यापुढेही देत राहील.
2. फिनटेक, इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वचनबद्धतेबद्दल शंका नसावी.
3. आम्ही काही काळ संबंधित संस्थेशी (पेटीएम पेमेंट बँक) संवाद साधत होतो.
4. पेटीएम समस्येवर नियामक तपशील शेअर करणे योग्य नाही.
5. दीर्घकालीन यशासाठी प्रत्येक घटकाने हे पैलू लक्षात ठेवले पाहिजेत.
6. RBI ने उचललेली सर्व पावले व्यवस्थेच्या स्थिरतेसाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत.
7. पेटीएमच्या समस्येवर आम्ही लवकरच FAQ जारी करू.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts